मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या न्यूड फोटोशूटमुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. रणवीरनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना त्याचे हे आवडले नाही, तर काहींनी त्याच्या फोटोंची स्तुती केली आहे. या फोटोमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा ठपका ठेऊन रणवीरविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी हे मूर्खपणा असल्याचं म्हणतं बॉलिवूडमधून रणवीरला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. कोणताच सेलिब्रिटी नाही ज्यानं त्याच्या विरोधात वक्तव्य केलं आहे. आता द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रीनं देखील रणवीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या विरोधात गुन्हा दाखल करण हा निव्वळ मूर्खपणा आहे, असं विवेक अग्नीहोत्री यांनी सांगितलं. 



रणवीरविरोधात एफआयआर दाखल करणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे. फोटोशूटमुळं वाद निर्माण व्हावा, असं काही नाही. काही कारण नसताना विरोध होतोय. गुन्हा दाखल करताना म्हटलंय की, रणवीच्या न्यूड फोटोमुळे महिलांच्या भावना दुखावल्यात. आता मी प्रश्न विचारतो की, 'महिलांचे इतके न्यूड फोटोशूट आपण पाहतो, तेव्हा पुरुषांच्या भावना नाही दुखावत का?'


काय आहे प्रकरण? 



रणवीरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक न्यूड फोटो शेअर केला. या फोटोमुळे समाजाच्या सर्व स्तरांतून त्याच्यावर टीका करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेनं रणवीरविरोधात थेट पोलिसांत धाव घेतली. हा फोटो मासिकासाठी काढण्यात आला असून, त्याची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे मिळविण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे समाजातील तरुण नीतिभ्रष्ट करण्याचा किंवा समाज बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. अशा कृत्यामुळं महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होत असून रणवीरविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अर्जाद्वारे या संस्थेने चेंबूर पोलिस ठाण्यात केली होती.