Vivek Agnihotri Tweet on Filmfare 2023: 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक हे बॉलिवूडवर अनेकदा झणाणून टीका करताना (Vivek Agnihotri Tweet) दिसतात. त्यातून आता विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर परत एकदा निशाणा साधला आहे. यावेळी हा निशाणा त्यांनी थेट नुकतेच प्रसिद्ध झालेल्या फिल्मफेअर (Filmfare Award) पुरस्कारावर साधला आहे. यावेळी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी 7 विभागात पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले होते. मात्र विवेक अग्निहोत्री यांनी फिल्मफेअर पुरस्कार हे नाकारलेले आहेत. कालच त्यांनी याबाबत एक ट्विट प्रसिद्ध केले आहे. सध्या हे ट्विट सगळीकडेच चर्चाचा विषय बनलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वीच या चित्रपटांच्या नामांकनांची यादी जाहीर झाली होती. तेव्हा द काश्मिर फाईल्स या चित्रपटाला अनेक विभागात नामांकन जाहीर झाली होती. परंतु विवेक अग्निहोत्री यांनी या पुरस्कारांना चक्क बॉयकॉट केलं आहे. आपण या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्यांचे ट्विट (Vivek Agnihotri News) हे चर्चेत आलं आहे. 


'द काश्मिर फाईल्स'सोबतच, 'गंगूबाई काठियावाडी', 'ब्रह्मास्त्र', 'भुल भुलैया 2', 'बधाई हो 2' आणि 'उंचाई' अशा मोठ्या आणि लोकप्रिय चित्रपटांना या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामाकंन प्राप्त झालं होते. परंतु इतक्या चांगल्या चित्रपटांसह आपल्यालाही नामांकन मिळाल्यानंतरही विवेक अग्निहोत्री यांनी काढता पाय घेतला आहे.  


काय म्हणाले विवेक अग्निहोत्री? 


विवेक अग्निहोत्री यांनी एक लांबलचक पोस्ट (Vivek Agnihotri Post) लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, मला माध्यमांतून कळाले की, द काश्मिर फाईल्स चित्रपटांला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारात एकूण 7 नामांकनं मिळाली आहेत. परंतु मी प्रामाणिकपणे या भ्रष्ट, अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार नाही त्याचं कारणंही मी तुम्हाला सांगणार आहे.   


त्यांनी याचे कारण सांगताना लिहिलं आहे की, फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय इतर कोणीही महत्त्वाचं नाही. बॉलिवूड स्टार्स यांच्याशिवाय इतर लोकांना, कुणालाही याचा काहीही फरक पडत नाही. म्हणूनच, फिल्मफेअर पुरस्कारच्या जगात संजय लीला भन्साळी किंवा सूरज बडजात्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांना महत्त्व नाही. संजय भन्साळीची ओळख तर आलिया भट्ट आहे तर सूरज यांची ओळख थेट अमिताभ बच्चन आहे. फिल्मफेअरच्या या पुरस्कारांवरूनच चित्रपट निर्मात्यांची प्रतिष्ठा ठरवली जात असते. ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. म्हणून बॉलिवूडमधील भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी व्यक्त करत मी असे पुरस्कार न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. 



ज्यांनी पुरस्कार मिळाला नाही त्यांचेही अभिनंदन


विवेक अग्निहोत्री पुढे म्हणतात की, कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा पुरस्कारांचा भाग होण्यास मी नकार देतो. लेखक आणि दिग्दर्शक आणि चित्रपटांच्या टीम्सना स्टार्सपेक्षा कमी वागणूक देतात. ज्यांनी पुरस्कार जिंकले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि ज्यांचे जिंकले नाही त्यांचेही मी अभिनंदन करतो. सोबतच या ट्विटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी दुष्यंत कुमार यांची एक कविताही शेअर केली आहे.