Vivek Agnihotri on Naseeruddin Shah : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. या दोघांपैकी कोणीही थांबायला तयार नाही. दोन दिवस आधी नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की 'द कश्मीर फाइल्स', 'द केरल स्‍टोरी' आणि 'गदर 2' सारखे चित्रपट लोकप्रिय होताना पाहणं ही एक चिंतेची बाब आहे. या चित्रपटांमध्ये फूट पाडण्याचे विचार दाखवण्यात आले आहेत. तर या सगळ्यात 'द कश्मीर फाइल्स' चं नाव ऐकताच विवेक अग्निहोत्री यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. पण यावेळी त्यांनी थोडं आणखी पुढे जाणून वक्तव्य केलं आहे. त्यांनी चक्क नसीरुद्दीन शाह यांना दहशतवाद्यांना पाठिंबा देणं पसंत असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक अग्निहोत्री यांनी 'द वॅक्‍सीन वॉर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात दिलेल्या एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांचा उल्लेख केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी 'झूम टीवी' ला मुलाखत दिली होती. यावेळी विवेक म्हणाला की 'मी नसीर साहेबांचा खूप मोठा प्रशंसक आहे, म्हणूनच मी त्यांना ताश्कंद फाईल्समध्ये कास्ट केले होते. पण आता ते ज्या पद्धतीच्या गोष्टी बोलत आहेत, त्यावरून असं वाटतंय की ते कदाचित खूप म्हातारे झाले आहेत किंवा ते आयुष्यात खूप निराश आहेत.'


पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'कधीकधी, लोक बर्‍याच गोष्टींमुळे निराश होतात किंवा कदाचित त्यांना असं वाटतंय की काश्मीर फाइल्सच्या सत्यामुळे त्यांच्याविषयी काहीतरी उघड होत आहे. कारण इतर कोणाच्या तरी कलेतून लोकांसमोर नग्न होणे लोकांना सहसा आवडत नाही. काहीतरी गडबड आहे, ते जे बोलतायत त्यावरून काहीतरी बरोबर नाही असं दिसून येतंय.'


हेही वाचा : त्या स्किटनंतर आले धमक्यांचे फोन; समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव


विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, 'मला असं म्हणायचं आहे की ते नरसंहाराचे समर्थन करणारे चित्रपट करण्यात आनंदी आहे, त्यांनी नरसंहाराचे समर्थन करणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, कदाचित ते त्यांच्या धर्मामुळे किंवा त्यांच्या निराशेमुळे असेल. कोणत्यातरी कारणामुळे कदाचित त्यांना दहशतवाद्यांचे समर्थन करणे आवडत असेल, पण मला नाही. नसीर काय म्हणतात, याची मला पर्वा नाही कारण माझ्याकडे दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता आहे. ते दहशतवाद्यांवर प्रेम करत असतील पण मला त्याची पर्वा नाही.”