Vivek Agnihotri: मागच्या वर्षी 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट तूफान गाजला. या चित्रपटाच्या तुलनेत बाकी सगळे बॉलीवूडचे चित्रपट हे अक्षरक्षः फ्लॉप ठरले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे नावंही यादरम्यान बहुचर्चित राहिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक अग्निहोत्रींचा लवकरच 'द दिल्ली फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यातूनही विवेक अग्निहोत्री हे ट्विटरवर जास्त सक्रिय राहतात. मध्यंतरी त्यांनी बॉलीवूडला घेऊनही काही वक्तव्ये केली होती जी विशेष चर्चेत राहिली होती तसेच त्याहून अधिक ते देशाच्या राजकारणावरही ट्विट्स करत असतात. 


मध्यतंरी 'काश्मिर फाईल्स'वरून सुरू झालेल्या वादंगामुळे विवेक अग्निहोत्री यांनी आपले ट्विटर अकांऊट डिएक्टिव्हेटही केले होते. त्यानंतर त्यांनी आपले अकाउंट परत सुरू केले होते. काहीच दिवसांपुर्वीच त्यांनी शाहरूख खान आणि सलमान खान यांनाही मध्यवर्ती ठेवून एक ट्विट केले होते ज्याचीही बरीच चर्चा होती त्यात ते असं म्हणाले होते की, ''जोपर्यंत बॉलीवूड शेहेनशहा, किंग आणि सुलतानांचे राज्य आहे तोपर्यंत बॉलीवूडला चांगले दिवस येणार नाहीत.'' 


आता पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्री आपल्या ट्विटरवरूनच चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र विवेक अग्निहोत्री यांनी आपला ट्विटरवरचा संन्यास जाहीर केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की "It’s time for Creative Solitude. Time to deactivate Twitter for some time. See you soon." 


त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून त्यांच्या आगामी 'द दिल्ली फाईल्स' या चित्रपटासाठीही त्यांचे चाहते उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. 



मागच्या वर्षी रिलिज झालेला 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर प्रकाशझोत टाकणारा होता.