मुंबई : तमिळ टीव्ही स्टार आणि रिऍलिटी शो ची होस्ट वीजे चित्रा (VJ Chitra)च्या आत्महत्येने दक्षिण भारतातील सिने जगताला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची आठवण करून दिली. चित्राचा मृतदेह ९ डिसेंबर रोजी एका हॉटेलच्या रुममध्ये पंख्याला लटकताना सापडला. चित्राची आत्महत्या ही तिच्या कुटुंबियांना आणि जवळच्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमिळ मालिका आणि रिऍलिटी शोची जान असलेली चित्रा खूप लोकप्रिय अभिनेत्री होती. चित्राने लॉकडाऊनच्या दरम्यान ऑगस्ट महिन्यात आपल्या आयुष्याशी संबंधित महत्वाची बातमी सगळ्यांना सांगितली. हेमनाथ या व्यक्तीचा चित्राने सगळ्यांसमोर हात धरला. यामुळे चित्राच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. 


हेमनाथ एक साधारण व्यक्ती आहे. पण मेहनतीने हेमनाथने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हेमनाथने एक दिवस चित्राला लग्नासाठी प्रपोझ केलं. हेमनाथच्या नजरेत प्रेम बघून चित्रा स्वतःला रोखू शकली नाही. दोघांनी या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतली. 


दोघांनी सर्वात अगोदर साखरपुडा केला आणि मग रजिस्टर लग्न केलं. त्यानंतर या दोघांचं आयुष्य अतिशय सुंदर सुरू होतं. लॉकडाऊननंतर हे दोघं जानेवारीत शानदार रिसेप्शन ठेवणार होते. दोघांचे चाहते या दिवसाची वाट पाहत होते. पण त्याच अगोदर ९ डिसेंबर रोजी चित्राच्या आत्महत्येची बातमी समोर आली. बुधवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी चित्राच्या निधनाची बातमी समोर आली. चेन्नई ते पूर्ण दक्षिण भारतात या बातमीने खळबळ उडाली. 


तपासात अशी माहिती मिळाली की, चित्रा नवरा हेमनाथसोबत ८ डिसेंबर रोजी शुटिंगवरून परतली. त्यानंतर दोघे हॉटेलमध्येच होते. त्यानंतर हेमनाथ चित्राला रूममध्ये सोडून निघून गेला. त्यानंतर आल्यावर बराच वेळ चित्रा दरवाजा उघडत नव्हती. चित्राच्या निधनानंतर पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चर्चा सुरू झाली आहे.