Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. खरंतर हेमांगीच्या पोस्ट या नेहमीच कोणत्यातरी विषयाला धरून असतात. हेमांगी ही कोणत्याही विषयावर बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. हेमांगीच्या पोस्ट या नेहमीच व्हायरल होत असतात. आता हेमांगी आणखी एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी हेमांगी ही मासिक पाळी आणि त्यावेळी देवळात जाण्यास करण्यात येणाऱ्या बंदीवर मत मांडताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमांगीनं तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगी ही मासिक पाळी आणि मंदिरात जाण्याविषयी बोलताना दिसते. खरंतर सोशल मीडियावर मैत्रियी बांदेकर नावाच्या एका मुलीनं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं की 'आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला... स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ' *वैज्ञानिक कारणं* ' सांगणारा... का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! कोणत्याही गोष्टीला हद्द असते! म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या गोष्टींना वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास 1 मिलियन लाईक्स! आणखी आश्चर्याची गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर, रिल पाठवणारी सोबत अजून बऱ्याच जणी होत्या, सगळ्या मुलीच! एक आता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक मायक्रोबायोलॉजीमध्ये मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेकच्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सिनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत?', असं ती मुलगी म्हणाली.



पुढे याविषयी सविस्तर सांगताना ती मुलगी म्हणाली की, 'बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नका जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका ना किमान! तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा, मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं व्हॅलिडेशन कशाला हवं? समाजाचं आहे की! याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणी पासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही" हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही! कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना human reproduction, menstrual cycle च्या मागचं विज्ञान शिकवता येतंय, किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं... मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो! आता फक्त खिन्न वाटतंय... यातून कुणीच वाचणार नाही... विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे,  अगदी शेवटापर्यंत, या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!'


हेही वाचा : The Elephant Whisperers मधील हत्तींना संभाळणाऱ्या आजी-आजोबांकडून दिग्दर्शिकेला 2 कोटींची नोटीस; पण कारण काय?


या पोस्टला शेअर करत हेमांगी कवी म्हणाली, 'खूप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!'