The Elephant Whisperers मधील हत्तींना संभाळणाऱ्या आजी-आजोबांकडून दिग्दर्शिकेला 2 कोटींची नोटीस; पण कारण काय?

The Elephant Whisperers : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा माहितीपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. तर याच माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, आता बोमन आणि बेली यांनी कार्तिकीला 2 कोटींची नोटीस पाठवली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 7, 2023, 04:09 PM IST
The Elephant Whisperers मधील हत्तींना संभाळणाऱ्या आजी-आजोबांकडून दिग्दर्शिकेला 2 कोटींची नोटीस; पण कारण काय? title=
(Photo Credit : Social Media)

The Elephant Whisperers : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या माहिती पटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विसनं केलं होतं. या डॉक्युमेंट्रीमध्ये बोमन आणि बेली या एका आदिवासी जोडप्यानं काम केले आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी कार्तिकी आणि सिख्या एंटरटेनमेंटवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यावेळी खुलासा केला की माहितीपटाचे शूटिंग करत असताना कार्तिकी त्यांच्याशी खूप छान बोलत होती. पण जेव्हा माहितीपटाला ऑस्कर मिळाला त्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला. कार्तिकी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागली आणि त्यांच्याशी बोलणं देखील टाळू लागली. इतकंच नाही तर त्यांनी कार्तिकी आणि निर्मात्यांनी लीगल नोटीस पाठवली आहे. 

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, बोमन आणि बेली या दोघांनी सांगितलं की माहितीपटाच्या शूटिंग दरम्यान, कार्तिकी गोन्साल्विस त्यांच्याशी खूप प्रेमानं आणि आदरानं बोलायची. पण जेव्हा चित्रपटाला ऑस्कर मिळाला त्यानंतर तिनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. बोमन आणि बेलीला आर्थिक मदत हवी आहे हे कार्तिकीला माहित आहे त्यामुळे ती असं करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोमन आणि बेली यांचं म्हणणं आहे की या डॉक्युमेंट्रीला मिळालेलं यश आणि कमाई पाहता त्यांना 2 कोटी रुपये मिळायला हवे. जेव्हा त्याच्यावर काही झालं नाही तेव्हा त्यांनी कार्तिकीला लीगल नोटीस पाठवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ साठी कार्तिकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमिलनाडू मुख्यमंत्री यांच्याकडून त्यांच्या आर्थिक मदत मिळाली होती. त्यांना लीगल नोटिसमध्ये बोमन आणि बेली यांचे म्हणणे आहे की डॉक्युमेंट्रीमधून मिळणाऱ्या पैशातून त्यांना घर, एक मल्टी -पर्पस गाडी आणि त्यांनी जितका वेळ त्या माहितीपटाला दिला त्याचा मोबदला देणार याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सोशल मीडिया एक्टिविस्ट आणि वकील प्रवीण राज यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया देत सांगितले की बोमन आणि बेली यांना कार्तिकीच्या अशा वागण्यानं खूप वाईट वाटलं आहे. कारण चित्रपट बनवताना त्यांना पैसे आणि व्यतिरिक्त त्यांच्या नातीच्या शिक्षणासाठी देखील मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण आता कार्तिकी चित्रपटातून मिळालेल्या मोबदल्यातून काहीही देत नाही. 

हेही वाचा : 'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया

रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद मंसूर नावाचे वकील त्यांची केस सांभाळत आहेत. बोमन आणि बेली यांनी पाठवलेल्या या नोटीसवर आता कार्तिकी आणि कंपनी सिख्या एंटरटेनमेंटनं स्पष्टीकरण देत एक नोटीस शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की बोमन आणि बेली यांना आधीच पैसे देण्यात आले आहेत. त्यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आहेत.