Warrant Against Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'कहो ना प्यार है' (Kaho Naa... Pyaar Hai) या ब्लॉकबस्टर चित्रपटातून अभिनय क्षेत्रातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) सध्या अडचणीत सापडली आहे. रांची सिव्हिल कोर्टानं तिच्या विरोधात वॉरंट जारी केलं आहे. अमीषावर हा आरोप रांचीच्या अरगोरा येथे राहणारे अजय कुमार सिंह यांनी केला आहे. अमीषावर फसवणूक आणि अडीच कोटींची फसवणूकीचा आरोप अजय कुमार यांनी केला आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अजय कुमार हा कोण आहे? अजय कुमार हा एक उद्योगपती आणि चित्रपट निर्माता आहे. याशिवाय अजय कुमारनं आजवर अनेक वेब सीरिज आणि इतर अल्बममध्ये भूमिका देखील साकारल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 मध्ये रांचीच्या हरमू हाउसिंग कॉलनीमध्ये डिजिटल इंडियावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळीच अजय सिंह आणि अमीषा पटेल प्रमुख पाहुणे आले होते. त्यानंतर अजयला चित्रपटाची निर्मिती करण्याची ऑफर मिळाली. हे पाहता अजयनं अमीषाला 2.5 कोटीचा चेक दिला होता. अमीषानं देसी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती करणार असं सांगत तिनं अजयकडून हे पैसे घेतले होते. पण आजवर हा चित्रपच बनलाच नाही. दरम्यान, अजयनं जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा अमीषानं टाळाटाळ करत अडीच कोटींचा चेक दिला मात्र, तो देखील बाऊंस झाला. 


दरम्यान, 2018 साली अजय सिंहनं रांचीमध्ये असलेल्या दिवाणी सत्र न्यायालयात ही तक्रार दाखल केली. त्यावर अजूनही सुनवाणी ही सुरु आहे. आता सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे की अमीषा पटेल न्यायालयात पोहोचणार की नाही. तर अजय सिंहनं अमीषा पटेलचा बिझनेस पार्टनर कुणार गूमरवर धमकावण्याचे आरोपही केले आहेत. 


हेही वाचा : Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा


'इंडिया टुडे' नं दिलेल्या वृत्तानुसार रांची न्यायालयानं अमिषा पटेलच्या प्रकरणात नाराजगी व्यक्त केली आहे. या प्रकरणात अमिषाविरोधात समन जारी करण्यात आलं आहे. इतकं होऊनही ती किंवा तिचा वकील कोर्टात पोहोचले नाही. आता या प्रकरणात पुढची सुनावणी ही 15 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. 


अमीषा पटेल गेल्या काही दिवसांपासून 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'गदर 2' हा सनी देओलचा चित्रपट आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. तर कलाकार या दरम्यान, सुद्धा प्रमोशनसाठी तयार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनिल शर्मा करत आहेत.