मुंबई : 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या आगामी भागात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र पाहुणे म्हणून येणार आहे. धर्मेंद्र यांना टीव्ही शोमध्ये पाहून मनोरंजनाचा दुप्पट डोस रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. अलीकडेच सोशल मीडियावर 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. रिअॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये एक कलाकार लेजेंड एक्टर धर्मेंद्र यांची कथा वाळूपासून ते पडद्यावर घेऊन जातो. कलाकाराची कला पाहून धर्मेंद्र भावूक होतात. आणि ते म्हणतात की, ही कला पाहून मला हादरवून सोडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये अभिनेते धर्मेंद्र यांची लाईफ स्टोरी दाखवण्यात आली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सानेहवालच्या मातीने धर्मेंद्रजींना जन्म दिल्याचं दाखवण्यात आलय. अगदी धर्मेंद्र यांचं जुनं घरही दाखवण्यात आलं आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या प्रोमो व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की, धर्मेंद्र जी यांना लहानपणापासून दिलीप कुमार यांच्यासारखं व्हायचं होतं. आणि ते आरशासमोर एक्टिंग करायचे. अशा प्रकारे सानेहवालचा कॉमन मॅन बॉलिवूडचा हीमॅन बनला.



'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये धर्मेंद्रजी म्हणतायेत की, 'मी त्या मातीच्या प्रत्येक कणाचा ऋणी आहे... धर्मेंद्र जीची कहाणी जाणून घेतल्यानंतर सर्वांचे डोळे पाणवल्याचं प्रोमो व्हिडिओमध्ये दिसत आहे. किरण खेर, शिल्पा शेट्टीपासून ते स्पर्धकही भावूक होतात. अभिनेते धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते लवकरच 'रॉकी अँड रानी' या सिनेमात दिसणार आहेत.