मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा फस्ट लूकसमोर आला. ज्यामध्ये इरफानसोबत राधिका मदान देखील दिसत आहे. या सिनेमाचा ट्रेलर गुरूवारी 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याअगोदर इरफान खानने एक इमोशनल असा मॅसेज पाठवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या या पोस्टरमध्ये इरफान खान इंग्लंडच्या महाराणीच्या रूपात दिसत आहे. त्यांच्यासोबत राधिका देखील दिसत आहे. राधिका सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या व्हिडिओ अनेक फोटो दिसत आहेत.



त्यामध्ये करिना कपूर, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी, दीपक डोबरियाल, डिंपल कपाडिया, किकू शारदा सारखे कलाकार या सिनेमात आहेत. या व्हिडिओ इरफान आपल्या आजारपणाबद्दलही बोलत आहे. पाहा काय आहे इरफान खानचा मॅसेज? 



या सिनेमाचा ट्रेलर उद्या म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. हा सिनेमा सुपरहिट सिनेमा 'हिंदी मीडियम'चा सीक्वल आहे. तसेच हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या शुटिंगप्रमाणेच याचं प्रमोशन देखील इरफानला करायचं होतं. पण तब्बेतीच्या कारणामुळे ते शक्य होत नसल्याचं या व्हिडिओत म्हटलं आहे.


आपल्याला माहितच आहे, इरफान खान गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरशी दोन हात करत आहे. तब्बेतीत फार सुधारणा न झाल्यामुळे सिनेमाच्या प्रमोशन करता हा पर्याय स्विकारला आहे.