Watch: चिमुकलीचा रेल्वे स्थानकावर जबरदस्त डान्स; पाहताना रेंगाळलेल्यांची ट्रेनही सुटली
बाजूला करा इतर गोष्टी, पाहा आजच्या दिवसातील सुपरहिट व्हिडीओ
Latest Trending News: रिअॅलिटी शो असो किंवा मग विविध स्पर्धा, गेल्या काही वर्षांमध्ये भारतात नृत्यकलेची लोकप्रियता प्रचंड वाढताना दिसत आहे. म्हणजे येणारा जाणारा प्रत्येकजण एखादं गाणं कानावर पडो किंवा न पडो, काही क्षण पाय थिरकवताना दिसतं. यातून काय मिळतं, तर यातून मनाचा आनंद मिळतो. विश्वास बसत नाहीये? मग या चिमुकलीचा व्हिडीओ पाहा. (Watch Small girl dance viral video railway station)
ज्या आत्मविश्वासानं ही मुलगी रेल्वे फलाटावर नाचत आहे, ते पाहताना तिच्यावरच अनेकांच्या नजरा खिळत आहेत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या 'हाल कैसा है जनाब का' या गाण्यावर ती ठेका धरताना दिसत आहे.
स्टेशनवरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाची नजर या मुलीच्या नृत्यकलेवर पडत आहे. नकळतच तिच्या या नृत्याला अनेकजण दादही देत आहेत. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.
काय कमाल नाचते ही... ही तर छोटा पॅकेट बडा धमाका... अशा असंख्य कमेंट तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. विश्वास बसणार नाही, पण तिचा डान्स पाहताना थांबून राहिलेल्या काहीजणांची ट्रेनही सुटली.... कमाल आहे ना? कारण, रेल्वे सुटली असतानाही म्हणे या मंडळींच्या चेहऱ्यावर चिमुकलीचा परफॉर्मन्स पाहिल्याचा कमाल आनंद होता.