Underrated Movies on OTT: कोणता चित्रपट कधी चालेल याचा काहीच नेम नाही. त्यातून कधी कोणता चित्रपट फ्लॉप होईल याचाही काही नेम नाही. असे अनेक सुपरस्टार आहेत. ज्यांचे चित्रपट हे फारसे चाललेही नाहीत. त्यातून तरीही या चित्रपटांची बरीच चर्चाही होती. आता ही चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की या चित्रपटांच्या लिस्टमध्ये नक्की कोणते कोणते चित्रपट आहेत. या यादीत रणबीर कपूर ते नवाजुद्दीन सिद्दीकी अशा अनेक सुपरस्टार्सचे चित्रपत्र यात आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यात कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे. सध्या बॉलिवूड चित्रपटांची चांगली चांदी रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही एकमेकांसोबत स्पर्धा रंगलेली असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आपण अशा काही चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले असून या चित्रपटांचीही बरीच चर्चा रंगलेली आहे. सध्या अशाच त्यांच्या काही चित्रपटांची चर्चा आहे. चला तर मग जाणून घेऊया याच काही चित्रपटांविषयी. 


रॉकेट सिंग 


रणबीर कपूरचा या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. यात रणबीर कपूरनं सेल्समनची भुमिका निभावली होती. परंतु हा चित्रपट बराच फ्लॉप झाला होता. आता हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. 


मांटो 


नवाजुद्दीन सिद्दीकीचा मांटो हा बायोपिक फारसा काही बॉक्स ऑफिसवर चालला नाही परंतु या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. शिवाय समीक्षकांनीही या चित्रपटाची प्रसंशा केली होती. हा चित्रपट नेटफ्सिक्सवर उपलब्ध आहे. 


मसान 


विकी कौशलचा मसान हा चित्रपटही फारसा गाजला नाही. परंतु या चित्रपटाची तरूणांमध्ये बरीच चर्चा होती. तेव्हा विकी कौशल हा काही मोठा सुपरस्टार नव्हता परंतु त्याच्या अभिनयानं त्यानं प्रेक्षकांवर आपली एक वेगळीच छाप पाडली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. 


राजकुमार रावचा न्यूटन


न्यूटन हा राजकुमार राव अभिनीत चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. परंतु समीक्षकांनीही या चित्रपटाची चांगलीच स्तुती केली होती. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.  


आंखो देखी 


आंखो देखी हा चित्रपटही तुम्ही ओटीटीवर अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. 


मार्गेरिटा विथ अ स्ट्रॉ 


मार्गेरिटा विथ अ स्ट्रॉ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही परंतु तो आता तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 


अनुराग कश्यपचा अग्ली


अग्ली हाही चित्रपट फारसा चालला नाही. तेव्हा हा चित्रपट तुम्ही डिस्ने पल्स हॉटस्टारवर पाहू शकता. 


कोसला का घोसला 


कोसला का घोसला हा चित्रपटही तुम्ही डिन्से प्ल हॉटस्टारवर पाहू शकता. या चित्रपटातून अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या भुमिका होत्या.