`सेक्रेड गेम्स` पेक्षाही `या` दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...
या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
मुंबई : OTT वर आपल्याला वेगवेगळ्या सीरिज पाहयला मिळतात. OTT वर तुम्हाला रोमॅन्टिक, थ्रिलर, सस्पेन्स ते हॉरर सगळ्या प्रकारच्या सीरिज मिळतात. विशेषत: ZEE5 वर, विविध शैलींमधील भरपूर ऑप्शन आहेत. जर तुम्हाला क्राईम आणि थ्रिलर पाहायला आवडत असेल तर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक अशी तमिळ सीरिज आहे, ज्याची कथा ही दहशतवाद्याच्या अवतीभोवती फिरते. ही सीरिज 80 च्या दशकातील मद्रासमध्ये दहशत माजवणाऱ्या 'ऑटो शंकर' या गुंडाची वासना, फसवणूक, विश्वासघात आणि सूड यांची भयानक कथा आहे.
आणखी वाचा : King Cobra च्या तोंडातून निघाला विषारी साप, ती घटना पाहून नागरिकही झाले थक्का, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
रंगा दिग्दर्शित 'ऑटो शंकर' ही अशा माणसाबद्दल आहे जो केवळ वाईट कृत्ये करून आनंदी असतो आणि तो कोणत्या चुकीच्या ठिकाणी जगत आहे हे देखील त्याला माहित नाही. ही सीरिज 'सेक्रेड गेम्स' सारखीच आहे. दोन्ही सीरिज या अशा माणसाच्या आयुष्यावर आहे जो गुन्हेगारीच्या जगात येतो आणि तिथेच मोठा होतो. गणेश गायतोंडे प्रमाणे शंकर देखील लैंगिक जीवनाचा आनंद घेतो.
आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा
पहिल्या भागात ऑटो शंकरचा अंत कसा होतो ते दाखवण्यात आलं आहे. शंकरला त्याच्या गुन्ह्यांसाठी फाशी होते. तर या सगळ्या कथेची सुरुवात ही एका ऑटो ड्रायव्हरपासून होते, जो पत्नी सुमती आणि मुलासोबत राहत असतो. शंकर कथिरावन (Arjun Chidambaram) नावाच्या पोलिसासाठी गुंड बनतो. जो स्वत: च्या फायद्यासाठी हिसंक बनतो. शंकर बेकायदेशीर दारूच्या आणि नंतर वेश्यागृहाच्या व्यवसाय करू लागतो.
आणखी वाचा : 'माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं', करीना कपूरचा गजबचा Attitude
मात्र, इतर पात्रांची कथा ही फारच मर्यादित आहे. सेक्स वर्कर चंद्रिका शंकरच्या पसंतीस उतरते. चंद्रिका खूप सुंदर असते. तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शंकरची कथा तुम्हाला एखाद्यावेळी आश्चर्यचकित करेल, पण अप्पनी सारथचा अभिनय नक्कीच तुमच्या मनावर छाप सोडेल.
आणखी वाचा : Boycott Laal Singh Chaddha वर विजय देवरकोंडाचं वक्तव्य, म्हणाला 'तुमच्यामुळे लाखो...'
सीरिजमध्ये गौरी शंकर म्हणजेच ऑटो शंकर या भूमिकेत अप्पनी सारथ दिसून येत आहे. या मालिकेत वसुधा ललिताच्या भूमिकेत दिसत आहे. सरन्या रवी ही शंकराची पत्नी सुमती आहे. सेल्वापांडियन मोहनच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्वयंसिद्ध चंद्रिका झाली आहे. अर्जुन चिदंबरम कथिरावन आणि राजेश देव बाबूच्या भूमिकेत.