भविष्यात होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट दाखविणारा कार्बनचा ट्रेलर रिलीज
फिल्म निर्माता जॅकी भगनानी यांनी नुकताच आपल्या आगामी शॉर्ट फिल्म `कार्बन`चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : फिल्म निर्माता जॅकी भगनानी यांनी नुकताच आपल्या आगामी शॉर्ट फिल्म 'कार्बन'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
हा चित्रपट ग्लोबल वॉर्मिंगवर आधारित आहे. यात २०६७चा कालखंड दाखविण्यात आला आहे. यात दाखविण्यात आले की २०६७ मध्ये ऑक्सीजन पण खरेदी करावी लागणार आहे. सध्या आपण टूथपेस्ट ब्रश जसे खरेदी करतो तसे खरेदी करावे लागणार आहे.
ही एक शॉर्ट फिल्म असून याचा एक विषय गंभीर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ही कन्सेप्ट दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, प्राची देसाई आणि जॅकी भगनानी दिसणार आहे. अजून हा चित्रपट कधी रिलीज होणार हे नक्की झालेले नाही.