मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओ मग नेमक्या का आणि कशा व्हायरल होतात, याची उकल करण्यापेक्षा त्या मोठ्या उत्सुकतेने पाहण्याकडेच अनेकांचा कल असतो. सध्याच्या घडीला अचानक असाच एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ आहे, बॉलिवूडमधील चिरतरुण सौंदर्याचं उदाहरण असणाऱ्या अभिनेत्री रेखा यांचा. रेखा म्हटलं की, प्रेम, नातं, कलाविश्व, सौंदर्य, नजर आणि आरस्पानी सौंदर्य अशाच गोष्टी लक्षात येतात. या व्हिडिओमध्ये याचीच झलक पाहायला मिळत आहे. 


बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीचा भाग सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेखा त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि एकंदरच त्यांच्याकडे पाहण्याच्या आणि विचार करण्याच्या इतरांच्या दृष्टीकोनाविषयी बोलत आहेत. अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या याच मुलाखतीमध्ये रेखा यांनी त्यांच्या सुरेल आवाजाची जादूही सादर केली होती. 


मुलाखतकारांच्या आग्रहाखातर रेखा यांनी मेहंदी हसन यांच्या नावे लोकप्रिय असणारी गजल सादर केली. 'मुझे तुम नजर से गिरा तो रहे हो.... मुझे तुम कभी भी भुला ना सकोगे...', असं त्या मोठ्या सुरात आणि तितक्याच आर्त भावनांनी म्हणताना दिसत आहेत. 



अभिनेता अली फजल याने रेखा यांच्या मुलाखतीचा काही भाग असणारा हा व्हिडिओ पोस्ट करत, तो आपल्याला भावला असल्याचं ट्विटमध्ये लिहिलं आहे. मुख्य म्हणजे रेखा यांनी छेडलेले सूर पाहता त्यांची साद नेमकी कोणासाठी होती, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेलच.. किंबहुना त्याचं उत्तरही तुमच्याचपाशी असेल... हो ना?