मुंबई : बऱ्याच काळानंतर अभिनेता हृतिक रोशन 'सुपर ३०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी कलाविश्वातील 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'हँडसम हंक' हृतिकची वेगळीच बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणाऱ्या हृतिकने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या सहकलाकारांविषयी काही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध भागांमधून आलेले 'सुपर ३०' मधील त्याचे सहकलाकार हे नेमके आहेत तरी कसे याची झलक हृतिकने शेअर केलेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. यातील कित्येक कलाकारांनी तर, पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर काम केल्याचं खुद्द हृतिकनेच व्हिड़िओच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे. 


हा व्हिडिओ गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे, हृतिकचं अफलातून नृत्य. 'लॉलीपॉप लागेलू' या प्रचंड गाजलेल्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या भोजपूरी गाण्यावर हृतिक बेभाग होऊन नाचतना  दिसत आहे. हे पाहता तुम्हालाही या गाण्यावर ठेका धरावासा वाटला तर नवल नाही. 



गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित कथानक 'सुपर ३०' या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टेलिव्हिजन अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि हृतिकची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे.