मुंबई : रविवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. याप्रकरणी फक्त सामान्य जनताचं नाही तर बॉलिवूड मंडळी आणि राजकीय नेते देखील आपले परखड मत व्यक्त करताना दिसत आहेत. तर या वादावर राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांच्या ट्विटवर अभिनेत्री सोनम कपूरने रीट्विट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमने आदित्य ठाकरेंचं केलेलं कौतुक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'निषेध व्यक्त करताना विद्यार्थांवर झालेला हल्ला फार चिंताजनक आहे. जामिया किंवा जेएनयू असो विद्यार्थांवर कोणत्याही प्रकारच्या बळा वापर करू नये.' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. 



तर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे असं देखील ते म्हणाले. तर त्यांचं हे ट्विट सोनमच्या पसंतीस पडलं आहे. 'आपल्याला अशाच नेत्याची गरज आहे...अजूनही अपेक्षा कायम आहेत.' असं ट्विट तिने केले आहे. तिच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या.



जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी रात्री उशिरा घडवून आणलेल्या हिंसाचारात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. रविवारी काही कपड्यानं चेहरा झाकलल्या लोकांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण आणि तोडफोड केली होती. त्यांच्या हातात काठ्या आणि लोखंडाच्या सळ्याही होत्या. 


साबरमती विद्यार्थी हॉस्टेल या हल्ल्याच्या टार्गेटवर होतं. जेएनयू विद्यार्थी संघटनेनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) वर हा हल्ला घडवून आणण्याचा आरोप केलाय. तर एबीव्हीपीनं डाव्या विचारसरणीच्या गटावर मारहाणीचा आरोप केलाय.