मुंबई : बॉलिवूड स्टार्स आलिया भट्ट आणि कतरिना कैफनंतर आता साऊथची सुपरस्टार नयनताराही लग्नाच्या तयारीत आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर नयनतारा आता बॉयफ्रेंड आणि फिल्ममेकर विघ्नेश शिवनसोबत सात फेरे घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

37 व्या वर्षी लग्न 
एका रिपोर्टनुसार, नयनतारा आणि विघ्नेश 9 जून 2022 रोजी तिरुमला तिरुपती मंदिरात शिवनशी लग्न करण्याचा विचार करत आहेत. लग्नाची तारीख समोर येताच या जोडप्याचे चाहते त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. नयनताराने ७० हून अधिक चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. आता अभिनेत्रीने वयाच्या 37 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे तिचे चाहते आणखीनच खूश होत आहेत.



सीक्रेट वेडिंगनंतर ग्रँन्ड पार्टी
या स्टार कपलचं लग्न गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, हे कपल लग्नानंतर त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्र आणि जवळच्या मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करतील..