Wedding Bells... `या` शुभ महुर्तावर Alia - Ranbir वर पडणार अक्षता...
कपूर आणि भट्ट कुटुंबात सनई-चौघडे वाजणार, `या` शुभ महुर्तावर आलिया- रणबीरवर होणार शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे. आतापर्यंत खरंच आलिया आणि रणबीर लग्न करणार? यावर प्रश्नचिन्ह होता. पण आता सर्व काही समोर आलं आहे.
लग्नासाठी पूर्ण तयारी सुरू आहे, पण अद्याप कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्याच्या लग्नाबाबत रोज नवीन अपडेट समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी म्हणजे आज दुपारी 2 वाजता आलिया भट्टच्या मेहंदीचं फंक्शन सुरू होणार असल्याचं समोर येत आहे. त्यांच्या वांद्रे येथील घरी हा कार्यक्रम होणार आहे.
उद्या दोघांचं लग्न होणार आहे. उद्या शुभ मुहूर्तावर दुपारी 3 वाजता रणबीर आणि आलिया लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.