मुंबई :  प्रत्येक लग्नात आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे पत्रिका. लग्नात पत्रिका कशी असावी यावर अनेकदा चर्चा होते. फक्त सर्व सामान्य लोकांमध्येचं नाही तर. सेलिब्रिटींमध्ये देखील पत्रिका फार सुंदर आणि देखीव असते. आता सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होते. पण आता सध्या अभिनेते अमिताभ बच्चन - अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेते ऋषी कपूर - नीतू यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1980 साली ते विवाह बंधनात अडकले होते. ऋषी आणि नीतू यांनी 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. ऋषी आणि नीतू यांना दोन मुलं आहेत. रणबीर कपूर आणि रिधिमा कपूर अशी त्यांची नावे आहेत.  


ऋषी आणि नीतू 'खेल खेल में', 'रफू चक्कर', 'कभी कभी', 'अमर अकबर एंथनी', 'दुनिया मेरी जेब में', 'जहरीला इंसान', 'जिंदा दिल', 'दूसरा आदमी', 'अनजाने में' और 'झूठा कहीं का' या चित्रपटांच्या माध्यमातून एकत्र झळकले होते. 



 महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक तर प्रत्येक वेळा होत असतं. बॉलिवूडमध्ये त्यांनी कठोर मेहनत घेत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुरूवातीच्या काळात त्यांचे सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास असर्मथ ठरले. पण ते खचले नाही. त्यांनी मागे वळून कधीही पाहिलं नाही. तेव्हा त्यांची साथ दिली जया बच्चन यांनी. दोघांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. 



फक्त एक सहकलाकार म्हणून नाही तर उत्तम जोडीदार म्हणून देखील त्यांची चर्चा होते. अखेर 3 जून 1973 रोजी लग्नंबधनात अडकले. अमिताभ आणि जया याचं लग्न जया बच्चन यांच्या मैत्रिणीच्या घरी लग्न झालं. 


जया जेव्हा वधुच्या रुपात आल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळून राहिल्या. त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या तुफान व्हायरल होत आहे. खूपच घाईत जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचं आयोजन झालं. या दोघांनी अतिशय साधेपद्धतीने लग्न केलं.