मुंबई : विराट कोहलीचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्याच्या चर्चा आहेत. या गुप्त विवाहाबद्दलची प्रत्येक अद्ययावत माहिती जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये आहे.


अनेक खुलासे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या विवाहाचं नियोजन करणारी देविका नारायण यांनी एका मुलाखतीत विराट अनुष्काच्या गुप्त वेडिंगबद्दल अनेक खुलासे केले आहेत. विराट आणि अनुष्काच्या विवाहात खूप कमी लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. देविका यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे विवाहाची तयारी गुप्त ठेवणे. 


अनुष्काही आश्चर्यचकीत


देविका यांनी मुलाखतीत म्हटले आहे, की "मला या विवाहाची तयारी करतांना हे माहित होतं की विवाह कोणाचा होतो आहे पण तरी आम्हाला त्यांचं नाव घेता येत नव्हतं. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटली, तेव्हा मी अनुष्काला भेटली तेव्हा देखील मी तिला अनुष्का म्हणून नाही तर वधू म्हणूनच हाक मारत होती. मला असं बोलतांना ऐकताच अनुष्का म्हणाली, तुला काय झाले आहे? मग मी त्यांना सांगितले की विवाहाची गुप्तता राखतांना आम्हाला या गोष्टीची सवय झाली. कारण आम्ही तुमचं नाव घेत नव्हतो.


असा झाला विवाह


देविका यांनी अनुष्का आणि विराट यांना विवाह हा एक भारतीय पद्धतीने झालेला विवाह असल्याचं म्हटलं आहे. वेलकम लंच झाल्यानंतर संगीत समारंभ आणि पहिल्या दिवशी साखरपुडा झाला. दुसऱ्या दिवशी मेहंदी सेरेमनी झाली. त्या दिवशी सर्वांनी बोनफायरचा देखील आनंद घेतला. त्याच रात्री गाण्याचा देखील कार्यक्रम होता. मग सर्वांनी गाणी म्हटली. तिसऱ्या दिवशी मग संपूर्ण विवाह सोहळा संपला.


रिटर्न गिफ्ट


वेडिंग प्लानर देविका यांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांना काय रिटर्न गिफ्ट दिलं याबाबतही खुलासा केला आहे. देविकाने सांगितलं की खूप कमी लोकांना माहित आहे की विराट आणि अनुष्का खूप अध्यात्मिक व्यक्ती आहेत. अध्यात्मावर त्यांचा खूप विश्वास आहे. हे रूमीच्या शायरीचे फॅन आहेत म्हणून त्यांनी पाहुण्यांना रिटर्न गि‍फ्ट म्हणून रूमीच्या कवितांचं संकलन भेट म्हणून दिली. फिनलँडमध्ये सध्या ते हनीमून एन्जॉय करत आहेत.