मुंबई : बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने हा वीकेंड खूपच खास ठरला आहे. तेलगू, हॉलीवूड, बॉलीवूड इत्यादी चित्रपटांनी मिळून शनिवार आणि रविवारी एकूण 68.12 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पण मे महिन्याचा शेवटचा वीकेंड हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काही खास नव्हता. एप्रिल महिन्याप्रमाणे या वीकेंडला तेलुगू चित्रपटाने पुन्हा एकदा बॉलिवूडला मागे टाकलं आहे.  तेलगू स्टार वरुण तेजच्या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया २ ला मागे टाकलं आहे. या वीकेंडला कोणी केला किती कोटींचा बिझनेस वाचा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

KGF चॅप्टर  2
KGF च्या दुसऱ्या भागाच्या यशानंतर यश हा केवळ भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा रॉकी भाई बनला आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटाने जगभरात १२३५ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला या आठवड्यात थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण होत आहेत.


अनेक
आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली आहे. शुक्रवारी 2.11 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर शनिवारी या चित्रपटाने 2.30 कोटींवर झेप घेतली. मात्र रविवारी पुन्हा एकदा त्याच्या संकलनात घट झाली. सुरुवातीच्या अंदाजानुसार, रविवारी चित्रपटाने 1.95 कोटींची कमाई केली आहे.


भूल भुलैया 2
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी झाला आहे. हॉरर-कॉमेडीने थिएटरमध्ये दुसऱ्या वीकेंडमध्ये 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित भूल भुलैया 2 ने 10 व्या दिवशी सुमारे 12.77 कोटींचा व्यवसाय केला, एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 122.69 कोटी रुपये झालं. म्हणजेच दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाने एकूण 24.12 कोटींचा व्यवसाय केला आहे.


टॉप गन मॅवरिक
टॉम क्रूझ-स्टार टॉप गन मॅवरिकला सकारात्मक समिक्षा मिळाली. हा चित्रपट 27 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतातील पहिल्या वीकेंडला याने एकूण रु. 12.67 कोटींचा व्यवसाय केला आहे. टॉप गन मॅव्हरिकचा 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भव्य प्रीमियर झाला. जिथे त्याला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळालं.


एफ 3: फन अँण्ड फ्रस्ट्रेशन
वेंकटेश, तमन्ना भाटिया आणि वरुण तेज अभिनीत तेलगू चित्रपट 'F3 - फन अँड फ्रस्ट्रेशन' ने पहिल्या वीकेंडला 27.15 कोटी रुपये कमवले आहेत. जर आपण दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोललो तर चित्रपटाने शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे 13.05 आणि 14.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.


डॉन
शिवकार्तिकेयन स्टारर 'डॉन'ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.  अभिनेता शिवकार्तिकेयनचा हा दुसरा मोठा हिट चित्रपट आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सिबी चक्रवर्ती यांनी केलं आहे.


सिनेमा आणि विकेंण्ड कलेक्शन
अनेक : 4.25 करोड़ रुपये
भूल भुलैया :  24.12 करोड़ रुपये
टॉप गन मेवरिक :  12.67 करोड़ रुपये
एफ 3 : 27.15 करोड़ रुपये