Abdul Gaffar Nadidadwala: 'वेलकम' (Welcome), 'हेराफेरी' (Hera Pheri) फेम आणि बॉलीवूड निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला  (Abdul Gaffar Nadidadwala) यांचं सोमवारी सकाळी निधन झालं. अब्दुल नाडियादवाला यांना एजी नाडियादवाला म्हणून ओळखलं जायचं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारदरम्यान हृदयविकाराचा झटक्याने (Cardiac Arrest) त्यांचं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. एजी नाडियादवाला यांनी पहाटे 1.40 वाजता अखेरचा श्वास घेतल्याचं नाडियादवाला यांचा मुलगा आणि निर्माता फिरोज नाडियादवाला(Firoz Nadiadwala)  यांनी सांगितलं. (welcome hera pheri fame and firoz nadiadwala father ag nadiadwala passes away due to cardiac arrest)


एजी नाडियादवाला यांचा प्रवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1953मध्ये धर्मेंद्र आणि रेखा यांच्या 'झूठ सच' या चित्रपटाच्या निर्मितीतून त्यांनी कलाविश्वात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 'लहू के दो रंग' ही अॅक्शन ड्रामा फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यांचा हेरा फेरी या कॉमेडी चित्रपटाने तर धुमाकूळ घातला.  



याशिवाय त्यांनी 'वेकलम', 'आवारा पागल दिवाना', 'आ लगे लग जा', 'शंकर शंभू', 'वतन के रखवाले', 'सोने पे सुहागा' यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. 69 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 50 हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. एजी नाडियाडवाला यांनी 1965 मध्ये प्रदीप कुमार आणि दारा सिंह याच्यासह महाभारत या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट महाकाव्य म्हणून ओळखला जातो.


नाडियाडवाला आणि फिल्म जगत 


नाडियाडवाला आणि फिल्म जगत यांचं अतूट नातं आहे. एजी नाडियाडवाला यांचे वडील एके नाडियादवाला हे देखील निर्माता होते. तर त्यांचा मुलगा फिरोज नाडियादवाला आणि चुलत भाऊ साजिद नाडियालवाला हे देखील निर्माते आहेत. पण साजिद यांचं वेगळं प्रोडक्शन हाऊस आहे.