मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तिच्याकडे एक 'गुडन्यूज' देखील आहे. अभिनेता अक्षय कुमार, दिलजीत दोसांज अभिनेत्री करिना कपूर खान, कियारा अडवाणी स्टारर 'गुडन्यूज' चित्रपटाचे पहिले तीन पोस्ट आज प्रदर्शित करण्यात आले आहेत. 'गुडन्यूज' चित्रपट या वर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या पोस्टरमध्ये दोन बेबी बम्पमध्ये अक्षय अडकलेला दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये दिलजीतची सुद्धा तिच अवस्था आहे. तिसऱ्या पोस्टरमध्ये करिना आणि कियारा झळकत आहेत. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून चित्रपटाचे पहिले तीन पोस्टर शेअर केले आहेत. 




ट्विटरवर पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'ख्रिसमसच्या खास दिनी गुडन्यूज पसरवू' असं त्यानं लिहिलं आहे. 'गुडन्यूज' एक अशा जोडप्याची गोष्ट आहे जे मुलासाठी प्रयत्न करत आहे. अक्षय आणि करिना चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकाणार आहे. २७ डिसेंबर २०१९ मध्ये 'गुडन्यूज' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.