गोविंदाच्या प्रचारादरम्यान, नेमकं असं काय घडलं की सर्वांची उडाली धावपळ
Govinda : नेमकं असं काय घडलं की गोविंदाच्या प्रचारा दरम्यान सगळ्यांचीच उडाली धावपळ
Govinda Got Sudden Chest Pain : बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेला होता. यावेळी अचानक त्याची तब्येत बिघडली. यावेळी सुरु असलेल्या रोड शोमध्ये अचानक गोविंदाची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यानं गोविंदानं मध्येच रोड शो सोडला आणि तो तिथून मुंबईला लगेच परतला आहे. गोविंदाची तब्येत अचानक बिघडल्यानं सगळीकडे गोंधळ उडाला होता. त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. गोविंदाच्या एका जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की तो आता ठीक आहे. तो दमला होता आणि त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान, गोविंदानं यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की गोविंदा हा जळगावच्या मुक्ताईनगर, बोडवाड, पाचोरा आणि चोपडा या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहोचला होता. रोड शो दरम्यान, त्यानं तिथे आलेल्या सगळ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करण्यासाठी आणि महायुतीला मतदान करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून गोविंदानं पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री घेतली आहे. 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मत-मोजनी होणार आहे.
दरम्यान, निवडणूकीच्या धरतीवर 1 ऑक्टोबर रोजी गोविंदानं चुकून स्वत: च्या पायावर गोळी झाडली होती. तो घरी त्याची रिवॉल्वर तपासत होता. ती रिवॉल्वर कपाटात ठेवत असताना खाली पडली आणि गोळी झाडली. त्यानंतर लगेच गोविंदाला मुंबईच्या के क्रिटी केयर आशिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस घरीच व्यायाम आणि फिजियोथेरेपी करण्याचा सल्ला दिला होता.
हेही वाचा : VIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
गोविंदाचा मॅनेजर शशि सिन्हा त्यानंतर त्यांची हेल्थ अपडेट दिली होती. त्यांनी एएनआयला सांगितलं होतं की 'गोविंदा हा कोलकाला जाण्याची तयारी करत होता. तर त्याची लायसेंस रिवॉल्वर केसमध्ये ठेवत असताना त्याच्या हातातून पडली आणि त्याच्या पायाला गोळी लागली. डॉक्टरांनी पायातून गोळी काढली असून आता त्याची अवस्था ठीक आहे.'