बापरे! समांथाला काय झालं? अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहत्यांची चिंता वाढली; म्हणाले, `खाणं-पिणं...`
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा नवा लूक पाहून चाहते चिंतेत...
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला चिंतेत टाकलं आहे. तिनं नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. सोशल मीडियावर आता एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर समांथानं पापाराझींसाठी पोज दिले. त्यावेळी तिचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं.
समांथानं या कार्यक्रमात काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी तिनं तिचे केस मोकळे सोडले होते आणि कमीत कमी एक्सेसरीज घातले होते. समांथाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चिंता वाटू लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत तिच्या आरोग्याला घेऊन चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी म्हटलं की तिनं खूप वजन कमी केलंय.
समांथाच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'तिला नक्की काय झालं की ती आता सुंदर दिसत नाही आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'देवा, तिचा चेहरा किती बदलला आहे. जोपर्यंत मी व्हिडीओचं कॅप्शन वाचलं नाही तोपर्यंत मी ओळखलंच नाही की ती कोण आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सर्जरीच्या जाळ्यात अडकली आणि तिची संपूर्ण सुंदरता आणि निरागसपणा हरवून बसली.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ती खूप वेगळी दिसते. बोटॉक्स आणि फिलर्समुळे तिच्यातील नैसर्गिक सुंदरता ही गायब झाली आहे. एकानं चिंता व्यक्त करत म्हटलं की ती आनंदी नाही.'
हेही वाचा : लग्नाच्या 3 वर्षानंतर आई होणार अंकिता लोखंडे! मित्रानंच केला खुलासा
समांथाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर समांथा रुथ प्रभू लवकरच 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये दिसणार आहे. ही सिटाडेलच्या रिमेकचं भारतीय व्हर्जन सीरिज आहे. याच्या ओरिजन्ल व्हर्जनमध्ये प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन होते. याच महिन्यात 'सिटाडेल: हनी बनी' चा टीझर प्रदर्शित झाला होता. जेव्हा समांथानं वरुण धवनसोबत काम करण्याविषयी म्हणाली, जेव्हा तू उठतो तेव्हा तो हाच विचार करतो की त्याच्या कलेला कसं चांगल्या पद्धतीनं तू सगळ्यांसमोर मांडेल. तो नेहमीच या गोष्टीवर लक्ष देताना दिसतो की प्रत्येक सीन हा अप्रतिम पद्धतीनं प्रेक्षकांसमोर यायला हवा. तो फक्त त्याच्या कामाला घेऊन समर्पित नाही तर त्यासोबत एक चांगली व्यक्त सुद्धा आहे, ज्याला मी भेटले आहे. तर ही सीरिज 7 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.