मुंबई : कोरोनामुळे अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. दिग्दर्शक आणि चाहते दोघेही सिनेमागृह उघडण्याची वाट पाहत होते. त्यातच आता 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सिनेमागृह सुरु होण्यास सुरुवात होते आहे. त्यामुळे येत्या काळात सिनेमागृह पुन्हा गर्दी पाहायला मिळणार आहे. यासोबतच अनेक मोठ्या बॅनरच्या सिनेमांच्या प्रदर्शनाचा मार्गही मोकळा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माता करण जोहरने ट्वीट करत आगामी सुर्यवंशीची रिलीज डेटही जाहीर केली आहे.  ऐन दिवाळीत सुर्यवंशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 नोव्हेंबरला हा सिनेमा अखेर मोठ्या स्क्रिनवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  या सिनेमाची उत्सुकता ट्रेलरमुळे जास्त वाढली होती. पण कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने या सिनेमाच्या डेट्स पुढे गेल्या होत्या.  पण आता दिवाळीत पुन्हा एकदा सुर्यवंशीमुळे थिएटर गजबजेल यात शंका नाही.



अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा असून कतरिना कैफ देखील हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे.