मुंबई : सध्या पुष्पा या चित्रपटाची हवा संपूर्ण देशात पसरली आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाद हे सगळ्यांच्या ओठावर रुळले आहेत. याच चित्रपटातील एका डायलॉगवर सध्या खूप मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देवमाणूस या मालिकेचं एक मीम बनण्यात आलं आहे. ज्याची सध्या खूपच चर्चा होत आहे. 


टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका देवमाणूस मधील अजितकुमार देव या व्यक्तिरेखेलासुद्धा पुष्पा प्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यामुळे पुष्पाच्या डायलॉग्सवर देवमाणसाचे मीम्स देखील व्हायरल होत आहेत. 


पुष्पाच्या अंदाजमधील डायलॉग अजितकुमार काहीसा असा म्हणतो - "देवमाणूस नाम सूनके भगवान समझे क्या? भगवान नही दानव है में" या मीमवर नेटिझन्स आपल्या कमेंट्सच्या रूपाने भरभरून प्रतिसाद देत आहेत. 



चाहते प्रेक्षक या मिमचा आनंद घेत आहेत पण देवमाणूसची प्रमुख भूमिका निभावणार अभिनेता किरण गायकवाड याला देखील हा मिम इतका आवडला कि त्याने देखील आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.