मुलीला टॉयलेट पेपरने गुंडाळून काय करत आहे सोहा अली खान
सोहा अली खानने तिची मुलगी इनाया नौमी खेमूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे
मुंबई : अभिनेता सैफ अली खानची बहीण आणि कुणाल खेमूची पत्नी सोहा अली खान भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी तिला चर्चेत राहायला आवडतं. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोहा अली खानने तिची मुलगी इनाया नौमी खेमूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या फोटोमध्ये सोहासोबत उभी असलेली छोटी इनाया टॉयलेट पेपरने गुंडाळलेली दिसत आहे. एकीकडे इनायाला या सगळ्या गोष्टींची जाणीव नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे सोहा तिला पाहून हसतेय. जाणून घेऊया काय आहे प्रकरण? सोहा अली खान तिच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
याचबरोबर काही युजर्सने फोटोवर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. आपल्या मुलीला टॉयलेट पेपरने गुंडाळून तिला 'अंडं' बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फोटोमध्ये दिसत आहे की सोहाने मुलगी इनायाला टॉयलेट टिश्यू पेपरने वरपासून खालपर्यंत पूर्णपणे गुंडाळलं आहे. फोटोमध्ये इनायाचे फक्त डोळे, बोटं आणि नाक दिसत आहेत.
इनायाचं तोंडही पेपरने बंद करण्यात आलं आहे. फोटो शेअर करत सोहाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझे छोटे इस्टर एग अंड्यातून बाहेर येण्यासाठी तयार आहे!! खरंतर, आज (17 एप्रिल) इस्टर संडे आहे, हा दिवस ख्रिश्चन धर्मात प्रभु येशूच्या पुनर्जीविताच्या आनंदात साजरा केला जातो. सोहा अली खाननेही या शुभ दिवशी तिच्या मुलीसोबतचा एक गोंडस क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.