Sharukh Khan Spruha Joshi : शाहरूख खानचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. त्याच्याशी आपल्याला एकदा तरी बोलता यावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यातून प्रत्येका अशा कलाकाराचीही हीच इच्छा असते की कधी आपण शाहरूख खानला भेटतो आहोत. सध्या शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा पाहायला मिळाली होती. हा शाहरूख खानचा हा चित्रपट प्रचंड गाजलादेखील. या चित्रपटानं जगभरातील विक्रम तोडले आहेत. त्यामुळे हा चित्रपट आताही सर्वत्र गाजतो आहे. गिरीजा ओक-गोडबोले हिला सुपरस्टार अभिनेता शाहरूख खानसोबत काम करण्याची शक्यता मिळाली होती. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यामुळे अशावेळी तिनं शाहरूख खान सोबत काम करायचा अनुभवही स्पष्ट करून सांगितला होता. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपलाही शाहरूख खानसोबतच एक अनुभव सांगितला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर मग पाहुया की नक्की ही अभिनेत्री कोण आहे आणि नक्की तिनं शाहरूख खानची कोणती आठवणं सांगितली आहे. स्पृहा जोशी ही आपल्या सर्वांची फार लाडकी अभिनेत्री आहे. तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. ती चांगली अभिनेत्री तर आहेच परंतु त्याचसोबत ती खूपच चांगली कवियत्रीही आहे. सध्या तिन 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली आहे. ज्यात तिनं शाहरूख खानचा एक गोड किस्सा सांगितला आहे. यावेळी वाढदिवसाला कोणाचा फोन यावा असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं फारच रंजक उत्तर दिलं आहे. 


यावेळी तिला हा प्रश्न विचारताच ती म्हणाली की, 'मला अमिताभ बच्चन, रेखा, शाहरूख खान, झाकीर खान यांचा फोन यावा.' यापुढे सांगताना ती म्हणाली की, ''यांपैकी जरी कोणी मला फोन केला तर वाढदिवस म्हणजे क्या बात हैं असं होऊन जाईल. शाहरूख खानचा फोन आला तर मी रडेनच. खरंच जर का उद्या मला शाहरूख खानचा फोन आला तर आधी मला विश्वासच बसणार नाही. कोणीतरी गंमत करतंय असंच मला वाटेल. 


यापुढे ती शाहरूख खानला कधी भेटली आहे का यावर तिनं खुलासा केला आहे. त्यावर ती म्हणाली की, योग गेलाय खरंतर... शाहरूखसोबत मला एक जाहिरात मिळाली होती. बऱ्यापैंकी गोष्टी पुढे गेल्या होत्या. पण शूटच्या ज्या तारखा होत्या त्या पुढे गेल्या. नवीन तारखा जमणार नव्हत्या. ती जाहिरात झाली आणि मग ती मला करता आली नाही. अगदी हेच माझं अमिताभ बच्चन यांच्यासोबतही झालं. त्यामुळे कामं करण्याची संधी हुकली.