Dhanush and Aishwarya: सध्या दाक्षिणात्त्य अभिनेता धनुष आणि पत्नी ऐश्वर्याची. सध्या सेलिब्रिटींमध्ये एक असा स्टार आहे ज्याने आपल्या पहिल्या लग्नाचालाच दुसरी संधी देण्याचा विचार करतो आहे आणि त्या अभिनेत्याचे नाव आहे धनुष (Dhanush). धनुष आपल्या पहिल्या पत्नीसोबतच पुन्हा एकदा संसार थाटणार असल्याची बातमी समोर येते आहे. परंतु या बातमीसोबतच ही बातमी खोटी असल्याचीही बातमी कळते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे नक्की यात काय तथ्य आहे यावर अद्याप तरी काहीच समजतं नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार, लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांच्यात समेट झाला असून, दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे असून धनुष आणि ऐश्वर्याने सध्या घटस्फोट घेण्याचा कोणताही निर्णय बदललेला नाही. 


दक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता धनुषनं (South Indian Superstar Dhanush) काही महिन्यांपुर्वीच पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोटाची घोषणा केली होती. साऊथचा सुपरस्टार धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची मुलगी ऐश्वर्याच्या (Rajnikanth Daughter Aishwarya) घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.


 त्याचवेळी या जोडप्याने आपला विचार बदलला असल्याची मोठी बातमी समोर आली होती.. जानेवारीमध्ये या जोडप्याने जाहीर केले की ते आता यापुढे एकमेकांसोबत एकत्र राहू शकत नाहीत. पण आता या जोडप्याला त्यांना त्याच्या लग्नाला दुसरी संधी द्यायची असल्याचे कळले होते. (Dhanush and Aishwarya Divorce) 



या वर्षाच्या सुरुवातीला धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, आम्ही 18 वर्षे एकमेकांसोबत मित्र म्हणून आणि मुलांचे पालक म्हणून घालवली आहेत पण आज आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.