मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय शो 'बिग बॉस ओटीटी' मध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद अनेकदा तिच्या लूक आणि आउटफिट्समुळे चर्चेत राहते. ती तिच्या फॅशन आणि हटके स्टाईलिंगमुळे सगळ्यांचे लक्षवेधून घेताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेद 15 ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिने पुन्हा एकदा एक ड्रेस परिधान केला जो चर्चेचा विषय बनला. तिच्या पोशाखांची खिल्ली उडवण्यापासून आता नेटकरी तिला 'महिला रणवीर सिंग' बोलत आहेत. 


उर्फी जावेदने वाढदिवसाचा पोशाख परिधान करून फोटोशूट केले. हा आऊटफिट तिच्या बाकीच्या आऊटफिटपेक्षा खूप वेगळा होता. उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने ब्राऊन पँट आणि ब्रा असा लूक केल्याचं दिसत आहे.



यासोबत तिने नेटचा दुपट्टा डोक्यावर घेतला आहे. फोटो शेअर करत उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्या स्वतःच्या वाढदिवसापूर्वी मी एक पार्टी केली होती. उद्या माझा वाढदिवस आहे, मला शुभेच्छा देणाऱ्यांचे आधीच आभार मानते आहे.