लग्नानंतर विकी कौशलला होतोय पश्चाताप?
विकी कौशलने आयफा पुरस्कार सोहळ्यात बरीच चर्चा केली
मुंबई : कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर विकी कौशल खूप आनंदी आहे आणि त्याचा आनंद त्याच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोमध्ये दिसत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ हे सध्या बॉलिवूडचे नवे लोकप्रिय लव्ह बर्ड आहेत. अलीकडेच, विकी कौशलने आयफा पुरस्कार सोहळ्यात बरीच चर्चा केली. यादरम्यान त्याला कतरिना कैफच्या नावाने खूप चिडवलं गेलं. आता अशा परिस्थितीत, IIFA अवॉर्ड्स 2022 चा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये होस्ट विकीला असा प्रश्न विचारते, जे ऐकून विकी आश्चर्यचकित झाला, पण त्या प्रश्नाचं उत्तरही अगदी स्पष्टपणे त्याला दिलं.
विकी आणि कतरिनाच्या फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याला होस्ट विचारते की, "जो लग्नाचे लाडू खातो, त्याला पश्चाताप होतो की, जो खात नाही त्याला पश्चाताप होतो ?". यावर विकी कौशल म्हणतो, "नाही नाही, खावे. खूप छान लाडू होतात". या उत्तरानंतर विकीही हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला हजारो लाईक्सही मिळाले आहेत.
व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की, "तुला कतरिना मिळाली आहे, तुम्ही 'नाही' कसं म्हणू शकता". तर दुसर्या यूजरने लिहिलं की, " कुणा-कुणासाठीच चांगलं असतं. तर कोणासाठी चांगलं नसतं." त्याचबरोबर चाहते व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजीसह कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे, विकी आणि कतरिनाचं लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय लग्नांपैकी एक होतं. सोशल मीडियावर या भव्य लग्नाची बरीच चर्चा झाली.