मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची बायोपिक 'संजू' 29 जून रोजी रिलीज झाली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनवर जोरदार कमाई केली आहे. या सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील अभिनयासाठी रणबीर कपूरचं भरपूर कौतुक होत आहे. मात्र तुम्हाला वाचून धक्का बसेल की, हा रोल रणबीर कपूरला कसा मिळाला आहे. 


रणबीर कपूरसाठी ऋषी कपूरने नेमकं काय केलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या सिनेमाने रणबीर कपूर पुन्हा एकदा चांगले दिवस आणले. तो सिनेमा त्याला त्याच्या वडिलांमुळे म्हणजे ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांच्यामुळे मिळाला आहे. या रोलकरता ऋषी कपूर यांनी संजू सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. त्यांच्या पायापडून रणबीर कपूरला सिनेमात काम देण्यासाठी विनवणी केली होती. याचा खुलासा स्वतः रणबीर कपूरने केला आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, रणबीरने सांगितलं की, पापा ऋषी कपूर काहीही करू शकतात. त्यांनी एक किस्सा सांगितला होता की, 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर राजकुमार हिरानी यांच्या घरी गेले होते. आणि त्यांच्या आईची भेट घेतली होती. याचमुळे राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' या सिनेमांत रणबीर कपूरला काम मिळालं आणि आता त्यानंतर संजू सिनेमात लीड रोल मिळाला. 


संजूची आतापर्यंतची कमाई 


संजू सिनेमाने आतापर्यंत 340 करोड रुपयांची कमाई केली आहे. या बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबत संजू हा सिनेमा सर्वात मोठ्या सिनेमांच्या पाचव्या नंबरवर आहे. 2018 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कमाऊ करणारा सिनेमा ठरला आहे.