मुंबई : अभिनेत्री झायर वसीमच्या बॉलिवूडला रामराम ठोकण्याच्या निर्णयावरून कलाविश्वात चांगलीच खळबळ माजली होती.  धर्माचं कारण देत तिने चित्रपट विश्वाला रामराम ठोकला होता. त्यामुळे तिचं चित्रपटसृष्टी सोडणं एक वादाचा मुद्द बनला होता. त्यानंतर अनेक कलाकारांनी या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया दिला होत्या. आता अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील तिच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, 'हा झयराचा व्ययक्तिक निर्णय आहे. कोणाच्या व्ययक्तिक जीवनात निर्णय किंवा सल्ले देण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आम्ही कामासंबंधी अनेक वेळा संवाद साधतो.'



झायरा वसीम 'द स्काय इज पिंक' चित्रपटात प्रियांकाच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. ११ ऑक्टोबर रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. कथेनुसार चित्रपटाचे शूटिंग मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये करण्यात आले आहे. 


जूही चतुर्वेदीने चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत आणि प्रीतम चक्रवर्तींनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील झळकणार आहेत.