मुंबईः रणबीर कपूर तब्बल चार वर्षांनी बॉलीवूडमध्ये कमबॅक करतो आहे. रणबीरने चार वर्षांपुर्वी संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम केले होते. तेव्हा तो चित्रपट पाहून चक्क रणबीरचे बाबा ऋषी कपूरही आश्चर्यचकित झाले होते. ''मी रणबीरचे चित्रपट पाहतच नाही जे होईल ते पाहू.. पुढे'' असं काहीबाही रणबीरच्या करिअरवरून बोलणारे आणि उदास झालेले ऋषी कपूर रणबीरचा 'संजू' हा चित्रपट पाहून भलतेच हॅप्पी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रणबीर हा त्याच्या 'शमशेरा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यातून नुकताच तो त्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने मम्मी नीतू कपूरच्या 'डान्स दिवाने' या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आला आणि आपल्या आईसोबत त्याने सगळ्यांसमोर डान्स केला. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या डान्सची चर्चा झाली आणि तो व्हिडीओही फारच व्हायरल झाला. त्यातून रणबीर लवकरच बाप होणार असल्याने आता सर्वत्र रणबीरचीच चर्चा आहे. त्यातून आता आलिया आणि रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटाचेही नवं गाणं रिलिज झाले आहे. 


सध्या अनेक बॉलीवूड स्टार हे नुकतेच एका इव्हेंटला एकत्र जमले होते. त्यामुळे अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. यावेळी तब्बल दहा वर्षांनी बनी आणि अवीही एकमेकांना भेटले. या बनी आणि अविला तूम्ही ओळखतलं का?, होय... हे तेच 'ये जिवानी हैं दिवानी'मधले अवी आणि बनी आहेत म्हणजे रणबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर. 


व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये रणबीर आदित्यला पाहिल्यानंतर आनंदीत दिसत आहे. रणबीरने चक्क त्याला मिठी मारली. तेव्हा दोघांनी एकमेकांनी जोरात मिठी मारली आणि त्याच उत्साहाच्या भरात रणबीरने आदित्याला कीस केले. या पुनर्मिलनाने चाहत्यांना 'ये जवानी है दिवानी'ची आठवण करून दिली कारण त्याच सिनेमात त्या दोघांनीही बेस्ट फ्रेन्ड्सची भुमिका केली होती. 


बॉलीवूड स्टारचा हा ब्रॉमान्स पाहून तर पापराझींही शांत बसू शकले नाहीत. आदित्यला पाहून रणबीर उत्साहाने म्हणाला, "ओह फ*के," आणि एकमेकांचे चुंबन घेत ते आपला ब्रॉमान्स थांबवू शकले नाहीत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आदित्य अलीकडेच 'राष्ट्र कवच ओम'मध्ये एक्शनपॅक अवतारात दिसला.