मुंबई : बॉलिवूडच्या काही कलाकारांना कॅन्सरची लागण झाली. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींना या आजाराने ग्रासलेलं समोर आलं. सुरूवातीला अभिनेता इरफान खान यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याचं समोर आलं. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ती मायेदशी परतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून ऋषी कपूर देखील न्यूयॉर्कमध्ये आहेत. एका आजारावर उपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. 


मात्र नवीन वर्षी नीतूने शेअर केलेल्या एका फोटोतून ऋषी कपूर देखील याच कॅन्सरने ग्रासले आहेत का? असा सवाल निर्माण झाला आहे. 


ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंहने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोत ऋषी कपूर, मुलगी ऋद्धिमा कपूर सहानी, तिचा नवरा आणि मुलगी तसेच रणबीर कपूर देखील सोबत दिसले. 


हा फोटो शेअर करताना नीतू सिंह यांनी कॅप्शन लिहिली आहे की... 2019 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. यावर्षी काही संकल्प नाही फक्त आशिर्वाद... ट्रॅफिक ते प्रदूषण कमी होऊ दे. आशा आहे की, भविष्यात 'कॅन्सर' हे फक्त एका राशीचं नाव राहू दे. गरिबी कमी होऊ दे आणि भरपूर प्रेम आणि चांगल स्वास्थसोबत असू दे. 



2018 मध्ये ऋषी कपूर यांच्या आईचं कृष्णा राज कपूर यांच निधन झालं. मात्र यावेळी ऋषी कपूर कुटुंबासोबत कुठेच दिसले नाहीत. यावेळी फक्त ऋषी कपूर यांची मुलगी दिसली. ऋषी कपूर, नीतू सिंह आणि रणबीर यांच्या गैरहजेरीचं कारण नंतर समोर आले.


ऋषी कपूर यांच्यासोबत उपचारा ठिकाणी हे दोघे उपस्थित होते. त्यानंतर असा तर्क लावला जात आहे की, ऋषी कपूर कॅन्सरने ग्रस्त आहेत. अनेक फोटोंमध्ये ते अशक्त दिसत होते.