Priyanka Chopra Prakash Jaju Controversy: अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि नामवंत अभिनेत्री आहे. मिस वर्ल्डची सौंदर्यस्पर्धा (Miss World Priyanka Chopra0 जिंकण्यापासून ते हॉलिवूडचीही आघाडीची अभिनेत्री असा प्रियंका चोप्राचा प्रवास राहिलेला आहे. आज तिला जगातील कोणती व्यक्ती नाही ओळखत? तिनं तिच्या सौंदर्यांनं, अभिनयानं आणि नृत्यानं आत्तापर्यंत आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अनेक सेलिब्रेटींच्या आयुष्यात एक छुपा कोपरा असतो जो वादग्रस्त असतो तसाच काहीचा (Priyanka Chopra case on Prakash Jaju) एक छुपा कोपरा हा प्रियंका चोप्राच्या आयुष्यातही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्षांपुर्वी प्रियंका चोप्राबद्दल अशी बातमी पसरली होती की तिनं तिनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि ती तसं पाऊल उचलू नये म्हणून तिला घरी खुर्चीवर बांधूनही ठेवण्यात आलं होतं परंतु हे कितपत खरं आहे याबद्दल तेव्हा माध्यमांमध्ये चर्चा पिकायला लागल्या होत्या. आताही (Controversy) या चर्चा अनेकदा सुरू असतात त्यातून प्रियंका चोप्रा आणि प्रकाश जाजूच्या केसबद्दलही अनेकदा लिहिले व बोलले जाते. 2002 मध्ये प्रियंकानं अनेक स्वत:ला संपवण्याचाही प्रयत्न केला असल्याचे नाना तऱ्हेचे अफवा पसरायला लागल्या. 


कोण आहे प्रकाश जाजू?


2008 साली प्रियंका चोप्रानं एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता आणि ती व्यक्ती होती प्रकाश जाजू. प्रकाश जाजू हा प्रियंका चोप्राचा सेक्रेटरी होता. प्रियंकानं आपल्या बॉलिवूडच्या संघर्षाच्या काळात तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी तिला घरी तिनं स्वत:च काही बरंवाईट करून घेऊ नये म्हणून खुर्चीवर (Who is Prakash Jaju) बांधून ठेवण्यात येयाचे असे काही विक्षिप्त आरोप प्रियंकावर प्रकाशनं केले होते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कथित बॉयफ्रेंड असीम मर्चेंट यांच्यात होणाऱ्या भांडणामुळे तिनं टोकाची पावलं उचलण्याचा प्रयत्न केला होता असा अफवाही पसरवली होती.


प्रकरण काय?


परंतु प्रियंकानं मात्र आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळले होते आणि आपल्याबद्दल जे काही बोललं गेलंय हे सगळं चुकीचं असल्याचे तिनं सांगितले होते. काही वर्षांपुर्वी तिनं याबद्दल खुलासाही केल्याचे मिडिया रिपोर्ट्मधून कळते आहे. प्रियंकानं प्रकाश जाजूनं केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले होते. 2008 मध्ये प्रियंकानं प्रकाश जाजूविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात (Prakash Jaju Case) धमकावणे आणि विनयभंगाची केस दाखल केली होती. या तक्रारीत तिनं त्याच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोपही केलो होता. जानेवारी महिन्यात होणारा खटकाही न्यायलायाकडून रद्द करण्यात आला होता.