मुलगा Condomची जाहिरात करतोय समजल्यावर काय होती रणवीरच्या बाबांची Reaction?
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या चित्रपटांमुळे आणि विचित्र कपड्यांमुळे कायम चर्चेत पण आता...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या चित्रपटांमुळे आणि विचित्र कपड्यांमुळे कायम चर्चेत असतो. त्याच्या या अंदाजामुळे काहींना तो फार आवडतो, तर काही जण मात्र त्याला सोशल मीडियावर ट्रोल करतात. पण कोण त्याला का ट्रोल करतं याचा त्याला काही फरक पडत नाही. बॉलिवूडमध्ये काम करताना अशा अनेक भूमिका पार पाडव्या लागतात ज्या कायम चर्चेत रहातात. GQ मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरला अभिनेते कधीचं Condomचा प्रचार करत नाही, तर तु कसं केलस? असा प्रश्न विचारला.
या प्रश्नावर रणवीर म्हणाला, 'कोणत्याचं मोठ्या अभिनेत्याने कंडोमचा प्रचार केला नाही. म्हणून मला असं वाटलं हे करायला हवं. मी Durexला फोन केला आणि मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे.' असं तो म्हणाला. रणवीर पुढे म्हणाला, 'मी Durex ब्रांडला पसंती दिली कारण मी त्याचा वापर केला होता. वयाच्या 12 व्या वर्षी मी सेक्स केलं'
शिवाय रणवीरच्या वडिलांनी सांगितलं की इतर अभिनेते जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावतात त्यामुळे तु सुद्धा असं काहीतरी कर... त्यानंतर रणवीरने आपल्याला जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याचं वडिलांना सांगितलं. मुलाला जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ते फार आनंदी झाले.
जेव्हा रणवीरच्या वडिलांना कळालं की त्याला Condomची जाहिरात मिळाली, तेव्हा ते शांत झाले आणि म्हणाले, 'मला विश्वास आहे की तु जे काही करशील विचार करून करशील...' सध्या रणवीरच्या आयुष्यातील हा किस्सा तुफान व्हायरल होत आहे.