मुंबई : नेहा धुपियाने चर्चेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सगळ्यात पहिला मोठा धक्का दिला तो आपल्या लग्नाचा. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केलं आणि याची कुणालाही माहिती नसताना अचानक याचे फोटो शेअर झाले. त्यानंतर ती गरोदर असल्यामुळे घाईत लग्न केल्याची बातमी आली. मग तर नेहा धुपियाने बेबी बंपसहीत एक फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथे प्रत्येक सेलिब्रिटी आपण आई- बाप होणार असल्याचं अगदी सहज सांगतो. तिथे नेहा - अंगदने ही गोष्ट लपवली. त्यामुळे खूप चर्चा झाली. पण अखेर नेहाने ही गोष्ट का लपवली याचा खुलासा देखील केला.  एका मुलाखती दरम्यान नेहाने सांगितलं की, गरोदरपणाचा परिणाम करिअर होत असतो. त्यामुळे अंगद आणि नेहाने ही गोष्ट काही दिवस लपवण्याचा निर्णय घेतला. नेहाला काही शूट करायचे होते. हे फोटोशूट काजोलसोबतचे असून 'हेलीकॉप्टर इला' बाबत होते. जर मी गरोदर असल्याचं सांगितलं असतं तर मला काम मिळालं नसतं.


तसेच नेहाचा टॉक शो 'नो फिल्टर नेहा' यावर देखील परिणाम झाला असता. यासगळ्यात समाधान देणारी ही गोष्ट होती की, माझे बेबी बंप 6 महिन्यानंतर दिसू लागले होते. नाही तर माझं काम करण कठीण झालं असतं. तसेच नेहा हे देखील म्हणाली की, तिला मॅटरनिटी लिव्हवर नाही जायचं. यावर ती म्हणाली की, माझी असं म्हणणं नाही की ज्या मुली ही सुट्टी घेतात ते चुकीचं आहे. मात्र हा निर्णय माझा सतत अॅक्टिव राहण्यासाठी आहे.