मुंबई : 1990 मध्ये रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं पण लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांतच त्यांच्या पतीचं निधन झालं. या सगळ्या आव्हानांचा सामना करूनही, रेखा पुन्हा एकदा प्रेम शोधण्याची आशा बाळगत होत्या. 2006 च्या एका मुलाखतीत रेखा यांनी तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यावर मोकळेपणाने चर्चा केली होती ज्यामध्ये त्यांनी पुन्हा योग्य माणूस मिळण्याची ईच्छा व्यक्त केली होती. तसंच प्रेम मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत रेखा यांनी आपल्या भावी पतीबाबत आपलं मत अतिशय विनोदी पद्धतीने शेअर केलं आणि म्हटलं की, 'मी हे नाकारत नाही. पण मला माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती खरंच कोणी भेटली तर मी माझ्या चाहत्यांना हे सगळं स्वत:हून सांगेन. तसंच मी माझा विचार बदलू शकते त्या व्यक्तीसाठी. जर अशी व्यक्ती माझ्याकडे  असेल तर मी माझं सगळं लक्ष त्या एका व्यक्तीवर केंद्रित करेन. मी त्याच्या जेवणाच्या मेनूचं वैयक्तिक निरीक्षण करीन, त्याच्यासाठी दुपारचं जेवण बनवेन आणि त्याला वैयक्तिकरित्या सर्व्ह करेन.'


याच मुलाखतीदरम्यान रेखानेही आई होण्याबाबतची आपली भूमिका उघड करत सांगितलं की, मला कधीच मुलं ह्वावी अशी माझी इच्छा नव्हती. तिने पुढे सांगितलं की, जरी तिला एक आदर्श माणूस सापडला तरी ती त्याच्याबरोबर मुले होण्याचा विचार करणार नाही.


रेखा यांचा विश्वास आहे की, मूल झाल्यावर त्यांचं लक्ष तिच्या पतीवरुन दूर होईल, जर मला मुलं जन्माला घालणारी व्यक्ती सापडली तर ते माझ्या प्राधान्यक्रमांशी फार विसंगत असेल. कारण जर मला मूल असेल तर मी इतर कशावरही लक्ष केंद्रित करू शकणार नाही.


रेखा यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक चढ-उतार असूनही, रेखा समाधानी जीवन जगत आहेत आणि स्टार-स्टर्ड इव्हेंट्स आणि तिच्या उपस्थितीने चाहत्यांची मने कायमच जिंकत असतात.  बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा वयाच्या 69 व्या वर्षीही चाहत्यांना घायाळ करत आहेत. रेखा आता सिनेमांमध्ये दिसत नाहीत मात्र अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रेखा दहजेरी लावत असतात. अनेकदा पापाराझीच्या कॅमेऱ्यात रेखा कैद होतात तर कधी अवॉर्ड फंक्शनला रेखा हजेरी लावतात. कोणत्याही कार्यक्रमांमध्ये त्यांचा साडी लूक सगळ्यांपेक्षा हटके आणि भारी असतो.