शाहरुखच्या घरात जबरदस्ती घुसला फॅन आणि...
सुपरस्टार शाहरुख खानचे अनके चाहते आहेत. त्याच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी नेहमी चाहत्यांची गर्दी असते. एका मुलाखतीत त्याने एका फॅन बद्दल मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचे अनके चाहते आहेत. त्याच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी नेहमी चाहत्यांची गर्दी असते. एका मुलाखतीत त्याने एका फॅन बद्दल मोठा खुलासा केला आहे.
शाहरुखने यूकेमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ज्या स्विमिंग पूलमध्ये तो अंघोळ करतो त्याचा स्विमिंग पूलमध्ये त्याच्या एका चाहत्याला अंघोळ करायची होती. याच्या शिवाय त्याची अजून दुसरी कोणतीही इच्छा नव्हती. त्याने शाहरुखला भेटण्याची इच्छा देखील नाही वर्तवली. ऑटोग्राफची देखील विनंती नव्हती. पण त्याला त्याच स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करायची होती.
सध्या शाहरुख त्य़ाच्या आगामी झिरो सिनेमाचं शूटींग करतो आहे. कॅटरिना कॅफ आणि अनुष्का शर्मा देखील या सिनेमामध्ये आहे. 21 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.