Aamir Khan : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरनं तिच्या चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट त्याच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. मात्र, शूटिंगच्या वेळी तिला अनेक अडथळे आले होते. त्यात एक सीन होता ज्यात आमिर खान आणि करिश्माला लिपलॉक करताना सगळ्यांनी पाहिलं. पण ते शूट करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांना तब्बल 47 रीटेक घ्यावे लागले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटातील तो सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावेळी असे किसिंग सीन चित्रपटात असणं ही सामान्य गोष्ट नव्हती. असं म्हटलं जातं की या सीनतं शूटिंग करताना करिश्माची हालत खूप खराब झाली होती. ज्यामुळे ती व्यवस्थित शॉट देऊ शकत नव्हती. हा सीन फेब्रुवारी महिन्यात ऊटीमध्ये शूट करण्यात आला. त्यावेळी तिथे खूप जास्त थंडी होती. स्वत: करिश्मानं एका मुलाखतीत या किसिंग सीनविषयीचा किस्सा सांगितला होता. 


करिश्मानं सांगितलं की खूप थंडी होती तेव्हा अशा परिस्थितीत हा सीन शूट करणं मोठा टास्क होता. ती आणि आमिर थंडीनं कुडकुडत होते. ज्यामुळे सीन ठीक शूट होऊ शकत नव्हता. ज्यामुळे रिटेक घ्यावे लागत होते. असं करत करत पूर्ण 47 वेळा किसिंग सीनचा रीटेक देण्यात आला आणि तेव्हा जाऊन सीक्वेंस नीट शूट झाला. 


हेही वाचा : किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले! नेहा धुपिया म्हणाली, 'मी विवाहित...'


किसिंग सीक्वेंसला सतत शूट करणं खूप कठीण होत होतं. किती प्रयत्न केला तरी परफेक्ट शॉट देता येत नव्हता. जेव्हा परफेक्ट शॉट मिळतं नाही हे दिग्दर्शकांच्या लक्षात आलं ते थांबले नाही. त्यांनी परत परत तो सीन शूट करण्यास सांगितलं. या सीनमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.