मुंबई : अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन ही अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे. जिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच भूरळ पाडली आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये तितकीशी सक्रीय नाही तरी देखील ऐश्वर्याच्या चाहत्यांची कमी नाही. ऐश्वर्या काय करते, कुठे जाते? हे सगळं जाणून घ्यायला लोकांना फार आवडते. तसे पाहाता अभिनेत्रीला साधं, सरळ राहाणं आवडतं. परंतु तरी देखील तिच्या सौंदर्याची चमक कधीही कमी होत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्रीचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्यासाडीत एका अवॉर्ड शोमध्ये आली आहे. त्यावेळी सगळ्यांच्याच नजरा ऐश्वर्यावर येऊन टिकल्या होत्या.


याफोटोमध्ये ऐश्वर्या आपला नवरा अभिषेक बच्चन सोबत दिसली आहे. तसेच ती आपले सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील बसलेली दिसत आहे. 


हा फोटो फिल्मफेअर मधील आहे. या शोच्या वेळेला आपण कसं काय सुंदर दिसू आणि आपली संस्कृती सांभाळू या गोष्टीची पूरेपूर काळजी घेताना देखील ऐश्वर्या दिसली. तिने साडी घातली असली तरी ती फारच सुंदर ग्लॅमरस दिसत आहे.



या शो दरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने काळ्या रंगाची हाफ आणि हाफ पॅटर्नची साडी घातली होती, जी हलकी होती तसेच त्यात ब्लिंगचा परफेक्ट टच दिसत होता. ऐश्वर्याने ही साडी भारतीय प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांच्या संग्रहातून निवडली होती.


या अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्या जास्त काळ आपले सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली. यामध्ये त्या दोघांमध्ये सासरे सुन असं नातं दिसलंच नाही. हे दोघेही मुलगी आणि वडिलांसारखेच दिसत होते.


एकदा जया बच्चन यांनी स्वत: सांगितलं होतं की, त्यांची मुलगी श्वेतापेक्षाही ऐश्वर्या अमिताभ बच्चन यांची लाडकी आहे.