मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. यावेळी ऐश्वर्या एका जुन्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीत ऐश्वर्याने पत्रकाराला दिलेल्या उत्तराची चर्चा सध्या सुरु आहे. पत्रकाराने विचारलेला प्रश्न ऐश्वर्याला आवडला नाही आणि तिने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशातील एका फ्रेंच पत्रकाराने ऐश्वर्याची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत पत्रकाराने ऐश्वर्याला पडद्यावरील न्यूडिटीबद्दल तिला प्रश्न विचारला होता. यावर त्या पत्रकाराला सडेतोड उत्तर देतं मी पत्रकाराशी नाही तर स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोलत असल्यासारखं वाटतंय. या मुलाखतीचा व्हिडीओ रेडिवर शेअर करण्यात आला आहे. 



या व्हिडीओत ऐश्वर्याला ऑनस्क्रीन न्युडिटीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्या म्हणाली, “मी कधीच तशा पद्धतीचं काम केलं नाही आणि मला भविष्यातही न्युडिटीमध्ये काहीच रस नाही.” या तिच्या उत्तरानंतरही पत्रकाराने तिला न्युडिटीबद्दल पुन्हा विचारलं. तेव्हा वैतागून ऐश्वर्या म्हणाली, “मला असं वाटतंय की मी एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोलतेय. मी नक्की कोणाशी बोलतेय? भाऊ तुम्ही पत्रकार आहात, त्यानुसार प्रश्न विचारा. 
 
ऐश्वर्या 2018 मध्ये ‘फॅनी खान’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता ऐश्वर्या ‘मणिरत्नम’ यांच्या बिग बजेट चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिका साकारणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आहे. तर त्या दोघांना एक मुलगी असून आराध्या असं तिचं नाव आहे. ऐश्वर्या इतकीच तिची लेक आराध्या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.