Shivrajyabhishek Din Wishes: प्रभो शिवाजी राजा! आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा संदेश, पहा व्हॉट्सॲप स्टेटस, फोटो

Shivrajyabhishek Din Wishes in Marathi: अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता. आज शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातोय.  या दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हे काही प्रेरणादायी शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

| Jun 06, 2024, 09:45 AM IST
1/7

Shivrajyabhishek Din Special : या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह, मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती झाह्ला.. ही गोष्ट काही सामान्य नाह्यी...

2/7

''निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।। नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति, पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा।।'' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!  

3/7

''माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा'' शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

4/7

‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…’ शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!  

5/7

''प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!'' शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा  

6/7

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.! 

7/7

रायगडाचे माथे फुलांनी सजले.. सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले... पाहून सोहळा छत्रपती पदाचा...सर्वांचे मन आनंदाने भारावले.. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!