Akshay Kumar: हिंदी सिनेसृष्टीत सध्या अनेक जोडपी लोकप्रिय आहेत. रियल लाईफ असो वा पर्सनल लाईफ. बॉलीवूड सेलिब्रेटींच्या वैयक्तिक जीवनात डोकं घालण्याचा सगळेच प्रयत्न करतात. अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही जोडीही बॉलीवूडची आवडती जोडी आहे. अनेक मुलाखतींसाठी ते एकत्रही असतात. अगदी अक्षय कुमारच्या ट्रेलर लॉन्चसाठी असो वा अगदी 'कॉफी विथ करन'सारखा शो...सगळीकडे ते दोघं एकत्र दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय आणि ट्विंकल यांनी कधीही भांडू नये अशी गोड अपेक्षा त्यांच्या चाहत्यांची असतेच. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जिथे ते दोघं चक्क स्टेजवरच भांडताना दिसतायत. हे व्हिडीओ खासकरून 'कॉफी विथ करण' या शोच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या एपिसोडनंतर अधिक व्हायरल होत आहेत. अक्षयने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली होती. तेेव्हा त्याला त्याच्या आणि ट्विंकलच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. शोमधून अक्षयने त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल खुलासा केला होता. पण आता मात्र ट्रोलर्सनी त्यांचा व्हिडीओ व्हायरल करायला सुरूवात केली आहे. 


एका क्लिपमध्ये अक्षय बोलताना त्याला मध्येच ट्विकंल अडवते आणि तिच्या अडवण्यामुळे अक्षय फारच चिडला आणि म्हणाला, ''अरे मुझे बोलने तो दो... ''. त्याचसोबत अक्षयने आपल्या पत्नीबद्दल मुलाखतीतून सांगितलेले काही छोटेमोठे किस्सेही शेअर केले आहेत. या व्यतिरिक्तही अशा आणखी छोट्यामोठ्या क्लिप्स एकत्र करत त्या व्हायरल केल्या आहेत.



ट्विकंल खन्ना या लेखिका असून त्या सर्वत्र वेबसाईट चालवतात. ज्यामधून त्या अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या मुलाखतीही घेतात. अक्षय कुमार हा त्याच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटातून ऑगस्टमध्ये दिसणार आहे. अक्षय आणि ट्विंकल यांनी याआधी 'कॉफी विथ करण' शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल अनेक खुलासे केले होते.