मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या नात्याच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आपल्या आवडत्या सेलेब्रिटींच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. आलिया आणि रणबीर लवकरच 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या या प्रेमी युलूलांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री आलियाची बेस्ट फ्रेंड अकांक्षा रंजन कपूरचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. तेव्हा या बर्थडे पार्टीला रणबीर सुद्धा उपस्थित होता. यावेळी आलिया आणि रणबीरचं प्रेम कॅमेऱ्या मध्ये कैद झालं. रणबीरला मिठीमारताना आलियाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 



यावेळी अकांशाचे मित्रमंडळी त्याचप्रमाणे अभिनेत्री आथिया शेट्टी, वाणी कपूर सुद्धा उपस्थित होत्या. आलिया-रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. ते नेहमी एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताना दिसतात. सध्या दोघेही केनियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात दोघांशिवाय अभिनेते अमिताभ बच्चन देखील भूमिका साकारणार आहेत.