जेव्हा बिग बी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरतात... पाहा व्हायरल फोटो
त्यांनी फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार आणि बिग बी, अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात त्यांच्या करिअरच्या कारकिर्दीत अनेक उतार-चढाव आले. त्यांचे आयुष्य हे आपल्यासारख्या नव्या पिढीसाठी रहस्यमय आहे. परंतु ते इंस्पीरेशनल व्यक्ती असल्याने आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. अमिताभ बच्चन हे 78 वर्षांचे आहेत. सध्या IPL आणि क्रिकेटमॅचचा माहोल असताना, बिग बींना देखील आपला मोह आवरला नाही आणि त्यांनी आपला बॅटिंग करताना एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
अमिताभ बच्चन यांचा हा फोटो तसा फार जूना आणि परंतु त्यांनी याला शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॅट पडली लहान, कसं खेळायचं क्रिकेट?
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ते खूप तरुण दिसत आहेत. त्याच्या हातात क्रिकेटची बॅट आहे आणि ते फलंदाजी म्हणजेच बॅटिंग करताना दिसत आहेत. हा फोटो पाहून तुम्हाला हे कळलंच असेल की, बिग बीच्या उंचीनुसार त्यांच्या हातातील बॅट त्यांना खूप लहान पडत आहे, पण तरीही ते पूर्ण शक्तीने शॉट मारण्याची तयारी करत आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा
फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये अमिताभ बच्चन यांनीही संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्यांनी लिहिले, 'लोकेशनवर क्रिकेट: जेव्हा शूट सुरु होते, मिस्टर नटवरलाल काश्मीरमध्ये शूट करण्यात आले ??? मला वाटतं ... बॅट थोडी लहान पडली' आता या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये बिग बींची मुलगी श्वेता बच्चन सुद्धा स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकली नाही. तिने या पोस्टवर डोळ्यात हार्ट असलेली इमोजी बनवली आहे.
आजही, अमिताभ बच्चन वर्क फ्रंटवर खूप सक्रिय आहेत, दुसरीकडे ते सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ब्लॉग. सर्वत्र अमिताभ आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत राहतात आणि त्याच प्रकारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
अमिताभ बच्चन यांनी नागराज मंजुळे यांच्या 'झुंड', धर्मा प्रॉडक्शनच्या 'ब्रह्मास्त्र' तसेच 'मेडे' आणि 'गुड बाय' चा मुख्य भाग शूट केला आहे. याशिवाय, दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न' चित्रपटातही ते विशेष पात्र साकारणार आहे.