Amitabh Bachchan - Dhirubhai Ambani : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी 70-80 चं दशक गाजलवलंय. मात्र, त्यांच्या करिअरचा ग्राफ हा 90 च्या दशकात घसरू लागला होता. त्याकाळात त्यांच्याकडे जास्त पैसे देखील नव्हते. अनेकांना त्यांच्या सक्सेस विषयी माहितीये पण त्यांच्या कठीण काळाविषयी नाही. हाच एक काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन यांना धीरूभाई अंबानी यांनी मदत केली होती. दरम्यान, अमिताभ बच्चन जेव्हा या कर्जातून बाहेर आले तेव्हा सगळ्यांसमोर धीरूभाई यांनी असं काही वक्तव्य केलं जे अमिताभ कधी विसरू शकत नाहीत. याविषयी सांगत बिग बी स्वत: भावूक झाले होते. तर त्यावेळी त्यांच्यासोबत तिथे असलेले मुकेश अंबानी हे देखील भावूक झाले होते. 


अमिताभ यांचा मोठा खुलासा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या क्लिपमध्ये अमिताभ बच्चन बोलताना दिसतात की 'आयुष्यात एकदा अशी वेळ आली होती, जेव्हा मी बॅंकरप्ट झालो होतो, माझं दिवाळ निघालं होतं. मी एक कंपनी सुरु केली होती ती नुकसानात होती. कोटींचं कर्ज होतं. माझा पर्सनल बॅंक बॅलेन्स हा शून्य झाला होता. पैसे कमावण्याचा कोणताही सोर्स सुरु नव्हता, सगळं जणू बंद झालं होतं आणि सरकारकडून घरावर छापे टाकण्यात आले होते. ही गोष्ट धीरूभाई यांना कळली. कोणालाही न विचारता त्यांनी त्यांचा लहाण मुलगा आणि माझे मित्र अनिल यांना सांगितले की याचा वाईट काळ सुरु आहे, त्याला काही पैशांची मदत कर. अनिलनं येईन मला हे सगळं सांगितलं.'



पुढे अमिताभ हा सर्व प्रकार सांगत म्हणाले, 'त्यांना जितकी मदत करायची होती, त्या रक्कमेनं माझ्या सगळ्या अडचणी संपल्या असत्या. त्यांची दया पाहून मी भावूक झालो. पण मला वाटलं की मी त्यांची मदत स्वीकारू शकत नाही. देवाच्या कृपेनं काही दिवसांनंतर ही सगळी संकटं गेली आणि संपूर्ण परिस्थिती बदलली. काम मिळू लागलं. त्यानंतर हळू हळू मी माझं सर्व कर्ज फेडू शकलो.' 


पुढे अमिताभ म्हणाले, 'एक दिवस संध्याकाळी धीरूभाईंच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादिवशी त्यांनी मला देखील आमंत्रित केलं. वरती लॉनवर धीरूभाई मोठ्या टेबलावर त्यांच्या मित्रांसोबत फायनॅनशिअल आणि कॉर्पोरेट वर्ल्डच्या काही दिग्गज लोकांसोबत गप्पा मारत होते. त्यांचं अचानक माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी मला बोलावलं. मला म्हणाले इथे ये आणि माझ्या जवळ बस. मला थोडं विचित्र वाटलं. मी माफी मागितली आणि म्हटलं मी इथे माझ्या मित्रांसोबत बसलोय. इथेच ठीक आहे. त्यांनी हट्ट धरला आणि मला तिथे बसवलं. मग त्यानंतर त्यांनी दिग्गज लोकांच्या पार्टीत म्हणाले की हा मुलगा धडपडला होता. पण त्यांच्या मेहनतीनं पुन्हा उभा राहिला आहे. मी त्याचा खूप आदर करतो. त्याचा असा स्वभाव आणि त्यांचे शब्द माझ्यासाठी त्या मदतीच्या पैशां पेक्षा खूप मौल्यवान आहेत. इतकं की मला माझ्या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करण्यासाठी तयार होते. हे त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.'